Rakesh Jhunjhunwala: शेअर मार्केटमधील बादशाह दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचे आज सकाळी निधन झाले. ते 62 वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते.
मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांचं निधन झालं आहे. झुनझुनवाला यांना किडनीचा आजार असल्याची माहिती समोर आली आहे. भारतातल्या अतिशय लोकप्रिय गुंतवणूकदारांमध्ये ते आघाडीवर होते. त्यांच्या प्रत्येक गुंतवणुकीकडे भांडवली बाजाराचं लक्ष असायचं.
शेअर मार्केटमध्ये कोणत्या शेअरवर पैसे लावण्याने फायदा होते याचं भाकित राकेश झुनझुनवाला करायचे. त्यांनी दिलेला सल्ला हा योग्य असायचा त्यामुळे अनेकजण त्यांच्या बोलण्याकडे कान लावून असायचे.
ब्रेकिंग! शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांचा अपघातात जागीच मृत्यू
राकेश झुनझुनवाला हे गुंतवणूक क्षेत्रातील दिग्गज होते. भारताचे वॉरेन बफे अशी त्यांची ओळख होती. कारण, बाजारातील नफा आणि तोटा याची अचूक जाण त्यांच्याकडे होती आणि त्यामुळेच त्यांनी खरेदी केलेले स्टॉक मालामाल होतात असं म्हटलं जातं.
झुनझुनवाला हे एक व्यापारी असून ते सीए होते. हंगामा मीडिया आणि अॅपटेकचे ते चेअरमन असून व्हॉईसरॉय हॉटेल्स, कॉनकॉर्ड बायोटेक, प्रोवोग इंडिया आणि जिओजित वित्तीय सेवा या कंपन्यांच्या संचालकीय मंडळातही त्यांचा समावेश होता.
Share your comments