मागील वर्षीपेक्षा यंदा साखरेच्या उत्पादनात विक्रमी वाढ झाली आहे. शेतकऱ्यांसाठी ही चांगली संधी होती. साखरेच्या उत्पादनात विक्रमी वाढ झाल्याने याची मोठ्या प्रमाणात निर्यात होणार व त्यामुळे स्वदेशात त्याचे दर वाढतील म्हणून साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली. या निर्णयामुळे शेतकरी वर्गाने नाराजी व्यक्त केली आहे.
मात्र हा निर्णय देशातील शेतकऱ्यांच्या हिताचे नसल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले. माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि महाराष्ट्र विधानसभेचे माजी उपाध्यक्ष बबनराव ढाकणे यांच्यावरील 'विधिमंडळातील बबनराव ढाकणे' या ग्रंथाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते झाले. शिवाय केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाचेदेखील उद्घाटन झाले. त्यावेळी मंत्री शरद पवार बोलत होते.
यावेळी केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रताप ढाकणे, माजी मंत्री बबनराव ढाकणे, आमदार निलेश लंके आमदार संग्राम जगताप, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, शिवसेनेचे दक्षिण जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे आदी उपस्थित होते. तसेच केंद्रीय रस्ते वाहतूक विकास मंत्री नितिन गडकरी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमाला सदिच्छा दिल्या.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : कृषी विद्यापीठांना मिळणार कोट्यावधींचा निधी; शेतकऱ्यांना होणार फायदा
या कार्यक्रमात बोलताना मंत्री शरद पवार म्हणाले, सध्या साखर एके साखर निर्माण करून चालणार नाही. आता कारखान्यांना इथेनॉल सारखे पर्याय निवडावे लागणार आहेत. इथेनॉल प्रकल्पाची केदारेश्वर सहकारी साखर कारखान्यांनी सुरुवात केली ही खरंच कौतुकाची बाब आहे. बबनराव ढाकणे यांनी आयुष्यभर जनतेची सेवा केली.
आता धान उत्पादकांचा प्रश्न मिटणार; विजय वडेट्टीवार यांचे मोदी सरकारला पत्र
सरपंच, सभापती, आमदार, खासदार, मंत्री अशा अनेक पदांवर त्यांनी कार्य केले. सर्व पदं व्यवस्थित संभाळून जनतेला न्याय देण्याचे काम त्यांनी केले. आता तोच वारसा प्रतापराव पुढे चालवत आहेत. आता या भागातील जनतेने विशेषत: तरुणांनी प्रतापराव ढाकणे यांच्या मागे ताकद उभी करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
महत्वाच्या बातम्या:
दोन भावांनी फुलशेतीतून फुलवले आयुष्य; आज लाखोंमध्ये खेळतात
अखेर मोदींनी 'ती' घोषणा केलीच; खात्यावर होणार उद्याच पैसे जमा
Share your comments