राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 20 ते 25 मिनिटे चर्चा झाली. संसदेतील पंतप्रधान कार्यालयात जाऊन पवार यांनी मोदींची भेट घेतली. या भेटीत नेमकी कोणती चर्चा झाली याचा तपशील समजू शकला नाही.
भेटीत शेतकऱ्यांचे प्रश्न यावर चर्चा?
शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट ही अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड 20 ते 25 मिनिटे चर्चा झाली. या भेटीत शेतकऱ्यांचे प्रश्न आणि राज्यातील राजकीय घडामोडींबाबत चर्चा झाल्याचं वृत्त आहे. मात्र, त्याला कुणीही अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
धरणग्रस्तांना मिळणार हक्काची जमीन; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा
मोठी बातमी : कारखान्याच्या 2100 सभासदांचे सभासदत्व रद्द, वाचा नेमके काय घडले...
तर्कवितर्कांना उधाण
शरद पवार यांनी आज पंतप्रधान मोदी यांची अचानक भेट घेतली. भेटीचा विषय नेमका समजू शकलेला नाही. राज्यात गेल्या काही महिन्यांपासून आघाडी सरकारच्या नेत्यांवर तपास यंत्रणांच्या धाडी पडत आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापलेलं आहे. या पार्श्वभूमीवर मोदी आणि पवारांची भेट अत्यंत मानली जात आहे.
आनंदाची बातमी ! नवीन ट्रॅक्टर ट्रॉली खरेदीसाठी सरकार देतंय 90 % अनुदान; असा करा अर्ज
Share your comments