औरंगाबाद: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना डी-लिट ही पदवी दिली आहे. ज्या मराठवाडा विद्यापीठाचं डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ करण्यासाठी सत्तेवर पाणी सोडावं लागलं. त्याच विद्यापीठाने तब्बल 32 वर्षानंतर डी. लिट देऊन गौरव केल्याने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार अत्यंत भावूक झाले.
या सोहळ्यात पवार काही क्षण स्तब्ध झाले होते. खासकरून जेव्हा त्यांच्या योगदानाचा आढावा घेतला जात होता, तेव्हा शरद पवार भावूक झालेले पाहायला मिळाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि डी. लिट पदवी देऊन गौरव केला.
कुलपती आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते या दोन्ही नेत्यांना डी. लिट देऊन गौरवण्यात आलं. शरद पवार यांना डी. लिट देण्यापूर्वी त्यांच्या कार्याचा आढावा घेणारी डॉक्यूमेंट्री दाखवण्यात आली. ही डॉक्यूमेंट्री दाखवताना शरद पवार यांचं नामांतर विस्तार आंदोलनातील योगदान अधोरेखित करण्यात आलं.
डिसेंबर महिन्यात 3 राशींना होणार लाभ; सर्व इच्छा पूर्ण होतील
ज्यावेळी पवारांच्या नामविस्तार आंदोलनाचा डॉक्यूमेंट्रीतून आढावा घेतला जात होता. तेव्हा शरद पवार भावूक झालेले पाहायला मिळाले. त्यांच्या चेहऱ्यावरचे भावपूर्णपणे बदलून गेले होते.
शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं पाळली नाहीत, 26 नोव्हेंबरला सरकार विरोधात राज्यभर आंदोलन
उपस्थितांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे राज्यातील एक ऐतिहासिक विद्यापीठ आहे. मला अजूनही विद्यापीठाच्या निर्मितीचा काळ आठवतो.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा या विद्यापीठाच्या निर्मितीशी संबंध होता, असं म्हणत शरद पवार यांनी विद्यापीठाच्या स्थापनावेळच्या राजकीय घडामोडी सांगितल्या.
खुशखबर! जुन्या पेन्शन स्कीम पुन्हा सुरु; सरकारचा मोठा निर्णय
Share your comments