राज्यात काल मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. काही दिवसांपासून याबाबत अनेक घडामोडी राज्यात घडत होत्या. असे असताना अजून एक मोठी घडामोड घडली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना आयकर विभागाची नोटीस आली आहे, यामुळे राजकीय वर्तुळातून याची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे. याला शरद पवार यांनीही उत्तर दिले आहे.
ही नोटीस 2004, 2009, 2014 आणि 2020 मध्ये दाखल केलेल्या निवडणूक शपथपत्रांसंदर्भात आयकर विभागाने शरद पवार यांना नोटीस पाठवली आहे. काही ठराविक लोकांना आयकाराच्या नोटिसा पाठवल्या जात असल्याबद्दल शरद पवार यांनी पत्रकारांची लक्ष वेधले आणि त्यांनी त्यांना आलेल्या नोटीसींची माहिती थेट पत्रकार परिषदेत दिली. वेगवेगळ्या निवडणुका संदर्भात आत्ता आयकर खात्याने नोटीस पाठवले आहे.
दरम्यान पवार म्हणाले, विरोधकांवर अंकुश ठेवण्यासाठी हे काम केले जात असून, सन 2004 पासून माहिती गोळा करण्यात आली आहे. त्यामुळे आयकर खात्याच्या कामात गुणात्मक वाढ झाल्याचे दिसते असा टोमणा पवार यांनी मारला. याबाबत मी याच्या संदर्भात सर्व माहिती घेतलेली असून माजी सर्व माहिती व्यवस्थित असल्याने मला चिंता करण्याची गरज नाही, मात्र ठराविक लोकांनाच या नोटीसा पाठवल्या जात आहेत असे पवार यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील तरुणाने भरला राष्ट्रपती पदासाठी अर्ज, चर्चांना उधाण...
तसेच यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, 'मला प्रेम पत्र आलंय, इनकम टॅक्सचे प्रेमपत्र... 2004, 2009, 2014 आणि 2020 च्या लढवलेल्या निवडणुकीतील प्रतिज्ञापत्राबद्दल इनकम टॅक्सने नोटीस पाठवली आहे. तसेच पवार यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारला शुभेच्छाही दिल्या. काल हा शपथविधी सोहळा पार पडला.
महत्वाच्या बातम्या;
डेअरीला दुध घालताना ही काळजी घेत का? होईल फायदा..
ईडीची कारवाई मात्र जरंडेश्वर कारखान्याचे दुसऱ्या क्रमांकाचे विक्रमी गाळप
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार नाही ५० हजार रुपयांचे अनुदान? वाचा अटी
Share your comments