आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर ऊस उत्पादक शेतकरी आहेत. यामुळे या शेतकऱ्यांना ऊसदर देताना दरवर्षी संघर्ष होत असतो. शेतकरी संघटना आणि कारखानदार यांच्यात हा वाद नेहेमीच होतो. असे असताना सध्या सोशल मीडियावर एक विडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये एका पठ्ठ्याने ऊस विकण्याचा एक भारी फंडा शोधून काढलाय त्यामुळे त्याला चांगला नफाही मिळतोय.
देशात मोठ्या प्रमाणावर ऊस पिकवला जात असला तरी सरतेशेवटी ऊस कारखान्याला जाईपर्यंत शेतकऱ्याच्या हातात किती रक्कम येते हे काही सांगायला नको. सर्व खर्च वजा करून शेतकऱ्याच्या हातात थोडी थोडकी रक्कमच हातात येते. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडतो. यामुळे शेतकऱ्यांनाच जोपर्यंत हा बाजार करायचा अधिकार नाही तोपर्यंत त्यांच्याकडे पैसे येणार नाहीत.
असे असताना एका पठ्ठ्याने ऊस विकण्याचा एक भारी फंडा शोधून काढलाय त्यामुळे त्याला चांगला नफाही मिळतोय. या व्यक्तीने उसाचे ग्रे विकण्याचा व्यवसाय थाटलाय. यापूर्वी आपण उसाच्या रसाचा व्यवसाय अनेकदा पहिला असेल. मात्र हा व्यक्ती उसाचे गरे विकतो आहे. याचा विडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
भोंग्याचा आवाज झाला आणि सभासदांनी जल्लोष केला! अखेर भीमा पाटस सुरू होणार
या उसाच्या गऱ्यांची किंमत १०० रुपये किलो आहे. हा व्यक्ती अगदी उसाची सालं काढून गरे अगदी पद्धतशीरपणे तुकडे करून लिंबू ,मसाला, मीठ मारून देतो आहे. अनेकांनी त्याचे कौतुक देखील केले आहे. शेतकऱ्यांनी व्यापारी बनले तरच त्याला चार पैसे मिळतील, नाहीतर व्यापारीच श्रीमंत होतील, आणि शेतकरी तसाच गरीब राहील, असे सांगितले जाते.
'त्या' कारखान्यांना ऊस तोडणेसाठी अडथळा आणू नये, राजू शेट्टी यांचे कार्यकर्त्यांना आदेश
सध्याची शेतीची परिस्थिती पाहता शेती क्षेत्रामध्ये नवनवीन युक्ती आणि तंत्रज्ञानाचा वापर करून शेती व्यवसाय यशस्वी करणे गरजेचे आहे. शेती बरोबरच शेतीपूरक व्यवसाय करणे आणि त्यातून नफा मिळवणे हा गरजेचे बनले आहे. असे केले तरच शेतकरी टीकेल नाहीतर येणाऱ्या काळात अनेक अडचणी येतील.
महत्वाच्या बातम्या;
देशी बटाटे विदेशींना पसंत, निर्यात 4.6 पटीने वाढली! आता बटाट्यापासून शेतकऱ्यांना चांगले दिवस..
शेतकऱ्यांच्या गाई दूध दरात 3 आणि म्हैस दरात 2 रुपयांची वाढ
शेतकऱ्यांनो काळजी घ्या! शेतातील विजेच्या तार आणि ट्रान्सफॉर्मर ऑईल चोरीच्या घटना वाढल्या...
Share your comments