Pratibha Shinde
परतीच्या पावसानं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांकडून सरकारकडे नुकसानभरपाईची मागणी केली जात आहे. आता नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई मिळावी यासाठी लोकसंघर्ष मोर्चा काढला आहे.
लोकसंघर्ष मोर्चातर्फे त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलनाला सुरुवात केली आहे. या जिल्ह्यातील सातपुडाचा दुर्गम भागात आणि तळोदा, अक्कलकुवा तालुक्यात परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे.
हेही वाचा: खुशखबर! आता मागेल त्याला मिळणार विहीर; विहीरीच्या अनुदानात वाढ आणि अट रद्द
त्यामुळे या भागात ओला दुष्काळ जाहीर करावा, तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्यात यावे तसेच आदिवासी बांधवांचे वन हक्क दावे मंजूर करण्यात यावे अशा अनेक मागण्यांसाठी त्यांनी हे आंदोलन केलं आहे.
हेही वाचा: आज ‘या’ चार जिल्ह्यात कोसळणार अवकाळी पाऊस; पंजाबराव डख यांचा अंदाज
जर येत्या पंधरा दिवसात या मागण्या मान्य नाही झाल्या तर मात्र दिल्लीत आंदोलन करण्यात येईल असा इशारा लोक संघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांनी दिला आहे. या आंदोलनात माजी मंत्री पद्माकर वडवी आणि लोक संघर्ष मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
हेही वाचा: आजचे राशीभविष्य: 'या' राशींच्या लोकांनी विचारपूर्वक निर्णय घ्या, यश हमखास मिळेल!
Share your comments