1. कृषीपीडिया

खुशखबर! आता मागेल त्याला मिळणार विहीर; विहीरीच्या अनुदानात वाढ आणि अट रद्द

आता मनरेगा सिंचन योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मागेल त्याला विहीर याप्रमाणे अनुदान मिळणार आहे. ज्याचं कारण म्हणजे या योजनेची अंतराची अट रद्द करण्यात आली आहे. यामुळे शेतकरी (Department of Agriculture) आता विहिरीसाठी अर्ज करू शकतात.

पाराजी आबासाहेब शिंदे
पाराजी आबासाहेब शिंदे
MGNREGA Irrigation Schemes

MGNREGA Irrigation Schemes

आता मनरेगा सिंचन योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मागेल त्याला विहीर याप्रमाणे अनुदान मिळणार आहे. ज्याचं कारण म्हणजे या योजनेची अंतराची अट रद्द करण्यात आली आहे. यामुळे शेतकरी (Department of Agriculture) आता विहिरीसाठी अर्ज करू शकतात. दोन सिंचन विहिरींमधील 150 मीटर अंतराची अट पुढील बाबींना लागू राहणार नाही. ही अट रद्द केल्याने शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

पात्रता

१. धारकाकडे किमान 0.40 (एक एकर) हेक्टर क्षेत्र सलग असावे.
२. महाराष्ट्र भुजल (पिण्याच्या पाण्यासाठी विनियमन) अधिनियम 1993 च्या कलम 3 नुसार अस्तित्वातील पेयजल स्त्रोताच्या 500 मीटर परिसरात नवीन विहिर ३. घेण्यास प्रतिबंध घालण्यात आलेले आहेत. त्यामुळे अस्तित्वातील पेयजल स्त्रोताच्या 500 मीटर परिसरात सिंचन विहिर अनुज्ञेय करु नये.
४. दोन सिंचन विहिरींमधील 150 मीटर अंतराची अट पुढील बाबींना लागू राहणार नाही.
५. दोन सिंचन विहिरीमधील किमान 150 मीटर अंतराची अट ही Run off Zone तसेच, अनुसूचित जाती व जमाती व दारिद्रय रेषेखालील कुटुंब यांकरिता लागू करण्यात येऊ नये.
६. लाभधारकाच्या 712 वर याआधीच विहीरीची नोंद असू नये.
७. लाभधारकाकडे एकूण क्षेत्राचा दाखला असावा.
८. ज्या लाभार्थ्यांना विहिरीचा लाभ देण्यात येणार आहे तो जॉब कार्डधारक असला पाहिजे.

हेही वाचा: 52 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता मिळणार ही भेट!

आवश्यक कागदपत्रे

• 7/12 चा ऑनलाईन उतारा
• 8 अ चा ऑनलाईन उतारा
• जॉबकार्ड ची प्रत
• सामुदायिक विहीर असल्यास सर्व लाभार्थी मिळून 0.40 हेक्टर पेक्षा अधिक सलग जमिन असल्याचा पंचनामा
• सामुदायिक विहीर असल्यास समोपचाराने पाणी वापराबाबत सर्व लाभार्थ्यांमध्ये करारपत्र.

 हेही वाचा: बाप रे ! शेतकऱ्यांना चुना लावत पीक विमा कंपन्यांनी 5 वर्षात कमवला इतक्या कोटींचा नफा
हेही वाचा: परतीचा पाऊस आणि अतिवृष्टी नंतर शेतकऱ्यांसमोर आणखी एक मोठे संकट; आता...

English Summary: Increase in well subsidy and cancellation of condition Published on: 05 November 2022, 11:36 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters