नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून जिल्हा बँक चर्चेत आहे. तालुक्यातील नांदुर्डी, दावचवाडी, रानवड, पालखेड व लोणवाडी येथे शेतकऱ्यांनी एकत्र येत बुधवारी निफाड तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा निर्धार केला आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे.
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Nashik District Central Cooperative Bank) थकबाकीदारांवर केल्या जात असलेल्या जप्तीच्या कारवाईविरोधात शेतकरी एकत्र येत आहेत. यामुळे आता हा संघर्ष अजूनच मोठा होणार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून हे शेतकरी आंदोलन देखील करत आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके मार्फत थकबाकीदार शेतकऱ्यांच्या जमीन जप्तीच्या कारवाईविरोधात शेतकरी संतप्त झाले आहेत.
महाराष्ट्राचा पहिला नंबर! पण कशात, इतर राज्यांच्या तुलनेत सर्वांत महाग वीज महाराष्ट्रात..
राज्य शासनाने विशेष पॅकेज देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, या मागणीसाठी उपोषणाचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आता सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या शेतकऱ्यांनी ‘आम्ही नादार झालो’ अशी शपथ घेत घरी मरण्यापेक्षा सरकार दरबारी उपोषण करून मरू असा निर्धार केला.
पुणे जिल्हा बँकेच्या पीक कर्ज मर्यादेमध्ये वाढ, शेतकऱ्यांना दिलासा..
शेतकरी संघटना यासाठी आक्रमक झाली आहे. केंद्र व राज्य सरकारच्या शेतीविरोधी धोरणामुळे शेतकरी पूर्णत: कर्जबाजारी झाला आहे. यावेळी शेतकरी संघटना समन्वय समितीचे राज्य अध्यक्ष भगवान बोराडे, शेतकरी संघर्ष संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधाकर मोगल, निफाड उपतालुकाध्यक्ष संजय पाटोळे, शेतकरी समन्वय समितीचे सदस्य तुषार गांगुर्डे, गंगाधर शिंदे, उमाकांत शिंदे, कृष्णा जाधव आधी शेतकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
उस्मानाबादी शेळीपालनाने शेतकरी होऊ शकतो श्रीमंत, जाणून घ्या काय आहे खासियत
कृषिपंपांच्या वीज दरात मोठी वाढ, शेतकऱ्यांना दुष्काळात तेरावा महिना..
सिबिल स्कोअरची अट न लावता बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज द्यावं, सरकारचा आदेश बँका पाळणार का?
Share your comments