1. बातम्या

सांगली जिल्हा बँक:बड्या नेत्यांच्या संस्थांना 100 कोटींची व्याजमाफी, परंतु शेतकऱ्यांचे काय? स्वाभिमानीचा आंदोलनाचा इशारा

जिल्हा मध्यवर्ती बँकेचा विचार केला तर या बँकेला ग्रामीण तसेच शेतकऱ्यांचा कणा असे संबोधले जाते.जिल्हा बँकेच्या वतीने शेतीसोबतच बिगर शेती तसेच सहकारी संस्थांसाठी कर्जपुरवठा केला जातो.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
sangli district central bank

sangli district central bank

जिल्हा मध्यवर्ती बँकेचा विचार केला तर या बँकेला ग्रामीण तसेच शेतकऱ्यांचा कणा असे संबोधले जाते.जिल्हा बँकेच्या वतीने शेतीसोबतच बिगर शेती तसेच सहकारी संस्थांसाठी कर्जपुरवठा केला जातो.

जिल्हा मध्यवर्ती बँक या शेतकऱ्यांना कायम आपल्या जवळच्या वाटतात.मात्र असे असतानाच सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने बड्या नेत्यांच्या संस्था वाचाव्या त्यासाठी ओटीएस वराईट ऑफ धोरणाला मंजुरी देण्याचा घाट घातला आहे. त्यासंबंधी शनिवारी अशा बड्या नेत्यांच्या संस्थांना जवळपास शंभर कोटींची व्याजमाफी तसेच 76 कोटींचे कर्ज राईट ऑफ करण्याचा प्रस्ताव शनिवारी सभेसमोर ठेवण्यात येणार आहे. यामध्ये पालकमंत्री जयंत पाटील तसेच संजय काका पाटील,माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख,सत्यजित देशमुख त्यासोबतच आमदार सुमनताई पाटील आदींच्या संस्थांचा समावेश आहे.यामध्ये शेतकऱ्यांनाहीवन टाइम सेटलमेंट योजनेचा प्रस्ताव ठेवण्यात आला असला तरी त्याची मुदत 2018 पूर्वीचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरू शकते.ओटीएसची मुदत 2021 करावी अशी मागणी होत आहे.

सांगली जिल्हा बँकेने सूतगिरण्या,दूध संस्थातसेच साखर कारखाने आधी उद्योगांनाजे कर्ज दिले आहेत ती रक्कम सुमारे एक हजार 100 कोटी रुपयांवर गेली आहे.निनाई, डफळे,  मानगंगा आणि यशवंत आधी कारखान्यांच्या वाहतूक यंत्रणेची करते तसेच वसंतदादा शाबू,प्रकाश ऍग्रो,नेरला सोया आदींसह अन्य संस्थांचे सुमारे शंभर कोटींची कर्जे आणि व्याज माफकरण्याचा प्रस्ताव शनिवारी19 मार्चला होणाऱ्या बँकेच्या आभासी सर्वसाधारण सभेत घेण्यात आला आहे.

 याविरोधात स्वाभिमानीचा आंदोलनाचा इशारा

 सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून बडयांना पायघड्या तर शेतकऱ्यांना जप्तीचा बुलडोजर चालवण्याचा विचित्र प्रकार सुरू आहे.बड्यांची कर्जमाफीचा निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा यासाठी जिल्हा बँकेसमोर शुक्रवारी बोंबाबोंब आंदोलन तसेच जोपर्यंत बँक निर्णय मागे घेत नाही तोपर्यंत सांगली येथे जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारास्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे. 

जिल्हा बँक ही एक आर्थिक संस्था असून या संस्थेत राजकारण आणू नये असे एकीकडे सांगितले जाते परंतुअसेअसताना पक्ष विस्तारासाठी कर्जमाफी आणि नव्याने कर्ज पुरवठा असे उद्योग बँकेत सुरू असून शेतकरी खपवून घेणार नाहीततसेच बँकेला राजकीय अड्डाबनवण्याचा जो काहीप्रयत्न होत आहे तो स्वाभिमानी शेतकरी संघटना यशस्वी होऊ देणार नाही असे देखील खराडे यांनी सांगितले.

English Summary: sangli district central bank give excuse in loan and intrest of some istitution of leader Published on: 16 March 2022, 12:49 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters