काटेपूर्णां अभयारण्यातील नैसर्गिक बेटावर पक्ष्यांसाठी अधिवास निर्माण करण्यासाठी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त काटेपूर्णा अभयारण्य येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सोमवारी 5 जूनला सिडबॉल निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
अकोला वन्यजीव विभाग, काटेपूर्णा अभयारण्यातील सर्व गाईड व निसर्गकट्टा, SFD यांच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात आला. या कार्यशाळेचे उद्घाटनप्रसंगी काटेपूर्णा अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी पवन जाधव यांनी जागतिक पर्यावरण दिनाचे महत्त्व सांगितले. यावेळी मंचावर वनपाल एम. डी. तुपकर, सपकाळ, वनरक्षक नीलेश खोडके.
निसर्गकट्टाचे अमोल सावंत, डॉ. संतोष सुरडकर, डॉ. मिलिंद शिरभाते अजय फाले, स्टुडन्ट फॉर डेव्हलपमेंट मनीष फाटे व योगेश पतंगे, निखिल यादव, सुहास मोरे, यश दोडेवार, दानिश पटेल, संपदा ढोके, भक्ती देशमुख, समीक्षा मिसळ उपस्थित होते.
केळीला हमीभाव निश्चित करा, वाढलेला उत्पादन खर्च पाहता शेतकरी अडचणीत..
अमोल सावंत यांनी सिडबॉल कसे बनवायचे याबाबत मार्गदर्शन केले व सहभागी विद्यार्थ्यांनी अमलताश, पळस, बेल व सीताफळ या बियांपासून जवळपास 500 सिडबॉल बनविले हे सर्व मिडवॉल पाऊस पडल्यावर काटेपूर्णातील धरणामधील शिवाय येथे पक्ष्यांना आवश्यक असणाऱ्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
समारोपीय कार्यक्रमात अकोला वन्यजीव विभागाचे विभागीय वन अधिकारी श्री. निमजे उपस्थित होते. तसेच पंजाबराव कृषी विद्यापीठ मुलानी जंगल सफारीचा आनंद सुद्धा घेतला.
सीडबॉल निर्मिती कार्यशाळेनंतर सहभागी कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना काटेपूर्णा अभयारण्यात जंगल सफारी करविण्यात आली. या जंगल सफारीत विद्यार्थ्यांनी अभयारण्यातील कन्याराणी पक्षी यांचे निरीक्षणासह जंगलातील गुड रस्ते. वनभव, वृक्षवेली आदीची माहिती जाणून घेतली. वेळी विद्यार्थ्यांना जंगलाचे महत्व पटवून देण्यात आले.
निंबोळी अर्क कसा तयार करावा? निंबोळ्या सध्या पक्व होण्याच्या मार्गावर...
विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी सहभाग बेटावर लावण्यात येणार आहेत. या घेतला होता. सहभाग प्रमाणपत्र देऊन कार्यक्रमाची समाप्ती करण्यात आली. कार्यशाळेच्या यशस्वीतेकरिता विष्णु लोखंडे, दत्ता शेलकर, विकास आकोडे, नागसेन आफोडे, प्रेम खंडारे, अजय डाकोरे, राम लोणकर रवी बेटकर, गजानन बेटकर व तृप्ती सिंकटवार यांनी परिश्रम घेतले.
शेती नाही, कृषी क्षेत्रातील या नोकऱ्या तुम्हाला बनवू शकतात लखपती, लाखात आहे पगार, जाणून घ्या..
तुम्ही कधी पांढरा आंबा पाहिला आहे का, जगातील सर्वात अनोखा वाणी आंबा, जाणून घ्या...
व्याजासहित एफआरपी आणि मुदत संपलेली रूपांतरित ठेवी द्या, पृथ्वीराज जाचक यांचे छत्रपती कारखान्याला पत्र..
Share your comments