1. बातम्या

पहाच हे कापसाचे खुश करणारे भाव,गेल्या पन्नास वर्षा मध्ये जे झाले नाही ते या वर्षी होत आहे

खरीप हंगामात कापसाचे उत्पादन घटल्याने यंदा दर तेजीत राहणार हे साहजिकच होते.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
पहाच हे कापसाचे वरचढ भाव,गेल्या पन्नास वर्षा मध्ये जे झाले नाही ते या वर्षी होत आहे

पहाच हे कापसाचे वरचढ भाव,गेल्या पन्नास वर्षा मध्ये जे झाले नाही ते या वर्षी होत आहे

खरीप हंगामात कापसाचे उत्पादन घटल्याने यंदा दर तेजीत राहणार हे साहजिकच होते. इथपर्यंत तर शेतकऱ्यांनीही अंदाज बांधून हंगामाच्या सुरवातीपासून (Cotton Stock) कापूस साठवणूकीवर भर दिला होता. मात्र, अपेक्षित दर मिळताच शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने का होईना कापसाची विक्री केली. शेतकऱ्यांना या निर्णयाचा फायदा झाला असला तरी यापेक्षा कित्येक पटीने फायदा हा व्यापाऱ्यांना होताना दिसत आहे. कारण शेतकऱ्यांनी विक्री केल्यानंतर आता (Cotton Rate) कापसाला विक्रमी दर मिळाला आहे. जिल्ह्यातील अकोट बाजार समितीमध्ये जे गेल्या 50 वर्षामध्ये झाले नाही ते यंदा घडले आहे. सोमवारी 11 हजार 845 असा विक्रमी दर मिळाला आहे. शेतकऱ्यांनी साठवणूक केलेल्या कापसाची विक्री केली. त्यामुळे वाढत्या दराचा फायदा हा व्यापाऱ्यांनाच होत असल्याचे बोलले जात आहे. 

वाढीव दर मिळवण्यासाठी सबंध चार महिने जे शेतकऱ्यांनी केले त्यापेक्षा महिनाभरात अधिकचा मोबदला हा व्यापाऱ्यांना मिळालेला आहे.

उत्पादनात घट, वाढीव दराने दिलासा

खरीप हंगामात निसर्गाच्या लहरीपणामुळे सर्वच पिकांचे नुकसान झाले होते. यामध्ये सोयाबीन आणि कापसाला मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. कापूस पीक अंतिम टप्यात असतानाच ढगाळ वातावरणामुळे बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादन निम्म्यावरच आले होते. महाराष्ट्रसह इतर राज्यामध्येही कापसाचे उत्पादन घटले. गेल्या काही वर्षापासून कापूस क्षेत्रात घट होत असतानाच घटलेले उत्पादन यामुळे यंदा विक्रमी दर मिळेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. 

अखेर तो सत्यात उतरला असून वाढीव दरामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

कॉटन सिटी’ ला मिळणार गतवैभव

काळाच्या ओघात अकोला जिल्ह्यातही कापसाचे क्षेत्र हे घटले आहे. कापसाचे दर आणि बोंडअळीमुळे होणारे नुकसान यामुळे शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल करुन खरिपात सोयाबीनला पसंती दिली आहे. त्यामुळे सरासरी क्षेत्रापेक्षा कमी लागवड झाली होती. पण यंदाचे उत्पादन आणि मिळालेले विक्रमी दर यामुळे पुन्हा कापसाच्या क्षेत्रात वाढ होईल असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. सध्या शेतकरी फरदडमधून उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करीत असले तरी आगामी वर्षात परस्थिती बदलेल असा विश्वास शेतकरी व्यक्त करीत आहेत.

50 वर्षातला ऐतिहासिक दर

अकोला जिल्ह्यातील अकोट बाजार समिती ही कापसाची मुख्य बाजारपेठ आहे. जिल्ह्यासह इतर भागातूनही कापसाची मोठी आवक होत असते. सध्या शेतकरी केवळ फरदडचा कापूस विक्रीसाठी आणत आहेत. असे असतानाही हंगामाच्या अंतिम टप्प्यात कापसाला तब्बल 11 हजार 845 असा विक्रमी दर मिळाला आहे. वाढलेली मागणी आणि घटलेला पुरवठा यामुळेच हे शक्य झाले आहे. अखेरच्या टप्प्यात शेतकऱ्यांनी साठवलेला कापूस विकला आणि आता त्याचाच फायदा व्यापाऱ्यांना झाला आहे. शिवाय हे दर टिकून राहतील किंवा यामध्ये वाढच होणार असल्याचा अंदाज आहे.

English Summary: See This cotton rate doing happy to farmers , back 50 years ago not come this rate Published on: 27 March 2022, 10:12 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters