जगात दिवसेंदिवस नवनवीन शोध लागत असतात. कृषी क्षेत्रात देखील रोजाना नवीन शोध आपणास बघायला मिळत असतील. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी तसेच मानवाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शेती क्षेत्राला चालना देणे अनिवार्य आहे या उद्देशानेच जगातील शास्त्रज्ञ शेती क्षेत्रात रोज नवनवीन प्रयोग करीत असतात. ऑस्ट्रेलियामध्ये देखील असाच काहीसा प्रयोग बघायला मिळाला आहे.
येथील राष्ट्रीय विज्ञान संस्था अर्थात सीएसआयआरओच्या प्रयोगशाळेत शास्त्रज्ञांनी नविन कापूस विकसित केला आहे. येथील शास्त्रज्ञांनी जनुकीय दृष्ट्या सुधारित जिएम कापुस तयार करण्यास यश मिळवले आहे. या संस्थेने कपाशीचे कलर टिशू अर्थात रंगीत उती विकसित केली आहे. येत्या काही दिवसात या कलर टीशुची येथील शास्त्रज्ञ पोषक वातावरणात लागवड करणार असल्याचे सांगितले जात आहे.
ही लागवड केलेली कपाशी पुनरुत्पादन करण्यास सक्षम असणार आहे यामुळे या कपाशीचा आगामी काही दिवसात जगातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. या कपाशीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे या कपाशी पासून मिळणाऱ्या तंतुमय पदार्थ अर्थात फायबर पासून थेट रंगीत वस्त्र बनवता येणे शक्य असणार आहे. अर्थात कापसाचा धागा हा रंगीत असणार आहे. यामुळे कापड तयार करण्यासाठी नव्याने कलरिंग करण्याची गरज भासणार नाही. या कापसामुळे थेट रंगीत कापड निर्मिती करणे आता शक्य होणार असल्याचा दावा कृषी वैज्ञानिकांनी केला आहे.
या कापसामुळे होणार पाण्याची बचत
मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, रंग तयार करण्यासाठी लाखो लिटर पाण्याची आवश्यकता असते. एवढेच नाही तर रंग तयार करण्यासाठी काम करत असलेल्या मजुरांना अनेक रोगांना सामोरे देखील जावे लागते यामध्ये त्वचा रोग, पोटाचे विकार, कॅन्सर, दमा यांसारखे रोग प्रमुख आहेत.
याशिवाय कापडाला रंगरंगोटी करण्यासाठी ज्या केमिकल चा उपयोग केला जातो त्यामुळे जमिनीचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याचा दावा केला गेला आहे. म्हणून ऑस्ट्रेलियात विकसित केलेल्या या कपाशी मुळे कापडासाठी रंगाचा वापर टाळता येणे शक्य होणार आहे यामुळे पाण्याची बचत होणार असून, मजुरांना होणारे रोग तसेच जमिनीचे होत असलेले प्रदूषण या सर्व गोष्टी टाळता येणे शक्य होईल.
कापूस उत्पादक शेतकऱ्यांना देखील होणार याचा फायदा
मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, ऑस्ट्रेलियामध्ये विकसित केल्या गेलेल्या कापसामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे देखील चांगभलं होणार आहे. मित्रांनो जसं की आपणास ठाऊकच आहे पांढरा कापूस लवकर काळा पडत असतो किंवा पांढरा कापसाचा लवकर दर्जा खराब होत असतो.
परंतु ऑस्ट्रेलियात विकसित केला गेलेला हा रंगीत कापूस या समस्येपासून वाचू शकतो आणि यामुळे या नवीन विकसित केलेल्या कापसाचा दर्जा अधिक काळ अबाधित राहू शकतो. तसेच हा कापूस रंगीत असल्याने या कापसाला पांढऱ्या कापसापेक्षा अधिक बाजार भाव प्राप्त होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे येत्या काही वर्षात कापूस उत्पादक शेतकर्यांची चांदी होणार असल्याचे सांगितले जात आहे.
संबंधित बातम्या:-
खरं काय! मोदी सरकार कृषी कायदे मागच्या दाराने का होईना लागू करेलच; सीताराम येचुरी यांचा गंभीर आरोप
बियाण्यावर बिजप्रक्रिया का करावी? जाणुन घ्या याविषयी काही महत्वाची माहिती
मक्याचा आडोसा घेऊन 'या' शेतकऱ्याने केलं असं काही विपरीत की पोलिसांनी टाकला छापा आणि……!
Share your comments