1. कृषीपीडिया

बियाण्यावर बिजप्रक्रिया का करावी? जाणुन घ्या याविषयी काही महत्वाची माहिती

कृषी तज्ञांच्या मते, जर पेरणी केलेले बियाणे निकृष्ट दर्जाचे असले तर त्या पिकाची व्यवस्थित वाढ होत नाही शिवाय अशा पिकाला रोगराईचा अधिक फटका बसतो यामुळे सहाजिकच उत्पादनात घट होते, यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. हे टाळण्यासाठी पेरणी करण्यापूर्वी बियाण्याला औषध लावले जाते या क्रियेलाचं बीजप्रक्रिया असे म्हटले जाते.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
बीजप्रक्रिया का करावी याविषयी सविस्तर जाणून घ्या

बीजप्रक्रिया का करावी याविषयी सविस्तर जाणून घ्या

शेतकरी बांधव (Farmer) उत्पादन वाढीच्या अनुषंगाने शेतीमध्ये वेगवेगळ्या उपाययोजना करीत असतात. एखाद्या पिकापासून चांगले दर्जेदार उत्पादन प्राप्त करण्यासाठी त्या पिकाच्या पेरणीपूर्वी देखील काही गोष्टी करणे अपरिहार्य असते. पिकाचे उत्पादन वाढावे म्हणून कृषी तज्ञ माती परीक्षण करण्याचा सल्ला देतात याबरोबरच पेरणी करण्यापूर्वी बियाण्याची बीज प्रक्रिया करण्याचा देखील सल्ला दिला जात असतो.

कृषी तज्ञांच्या मते, जर पेरणी केलेले बियाणे निकृष्ट दर्जाचे असले तर त्या पिकाची व्यवस्थित वाढ होत नाही शिवाय अशा पिकाला रोगराईचा अधिक फटका बसतो यामुळे सहाजिकच उत्पादनात घट होते, यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.

हे टाळण्यासाठी पेरणी करण्यापूर्वी बियाण्याला औषध लावले जाते या क्रियेलाचं बीजप्रक्रिया असे म्हटले जाते. बीज प्रक्रियामुळे बियाण्यावर सुप्त अवस्थेत दडलेले रोग तसेच इतर विषाणू नाहीसे होतात आणि यामुळे पिकाची चांगली वाढ होते शिवाय रोगराईचा फटका बसत नाही म्हणून दर्जेदार उत्पादन प्राप्त होऊ शकते. पिकांवर रोगराई ही बियाणे मार्फतच पसरत असते त्यामुळे पेरणी करण्यापूर्वी बीजप्रक्रिया करणे महत्त्वाचे ठरत असल्याचा दावा कृषी तज्ञ करत असतात.

बियाण्यावर बीजप्रक्रिया का करावी किंवा बियाण्यावर बीजप्रक्रिया केल्याने होणारे फायदे

कृषी तज्ञ कोणत्याही पिकाच्या बियाण्याची पेरणी करण्यापूर्वी बियाण्यावर बीजप्रक्रिया करण्याचा सल्ला देतात. बीज प्रक्रिया केल्याने बियाण्यावर असलेले उपयोगी सूक्ष्मजीव पेरणी केल्यानंतर आपोआप जमिनीच्या संपर्कात येतात नंतर पिकाची वाढ होऊ लागल्यास पिकाच्या मुळाशी संपर्क करतात आणि जमिनीतील सेंद्रिय पदार्थांवर नैसर्गिक रित्या वाढतात आणि मुळा खालील असलेला पृष्ठभाग व्यापतात आणि पिकाच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार करण्याचे कार्य करतात.

यामुळे बीज प्रक्रिया करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. बीज प्रक्रिया केल्यामुळे उत्पादनात भरीव वाढ होते तसेच रोग राई पिकावर हल्ला चढवत नाही त्यामुळे उत्पादनात वाढ आणि उत्पादन खर्च अतिशय कमी येतो.

संबंधित बातम्या:-

भाजपच्या काळातील चुकांमुळे वीजबिलाचा फुगवटा; सहकार मंत्री बाळासाहेब पाटलांचा गंभीर आरोप

काहीही हं महावितरणा! शेतपंपाचे 33 लाखांचे काढले वीजबिल; शेतकऱ्याची झोपचं उडाली

मक्याचा आडोसा घेऊन 'या' शेतकऱ्याने केलं असं काही विपरीत की पोलिसांनी टाकला छापा आणि……!

English Summary: Why seed treatment? Here's a few basic facts about a stomp pad Published on: 20 March 2022, 04:19 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters