1. बातम्या

कोणतेही कागदपत्र न देता एसबीआय देतंय ५० हजारांचं कर्ज

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडियाने देशातील छोट्या व्यापाऱ्यांसाठी एक भन्नाट ऑफर आणली आहे. या योजनेतून बँक व्यापाऱ्यासाठी  ५० हजार रुपयांचे कर्ज त्वरीत मंजूर करणार आहे. बँकेच्या या ऑफरमुळे व्यापाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. ज्या व्यापाऱ्यांना आपला व्यवसाय वाढवायचा असेल तर त्यांच्यासाठी स्टेट बँकेची ही योजना खूप उपयोगी ठरणार आहे.  एसबीआय आपल्याला मुद्रा लोन योजनेच्या मार्फत कर्ज देते. मुद्रा लोन योजना ही केंद्र सरकारने सुरू केलेली योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पहिल्या कार्यकाळात पंतप्रधान मुद्रा योजना सुरू केली. मुद्रा लोन हे तीन प्रकारात दिले जाते. व्यापारी किंवा छोटे व्यापारी शिशु लोन, किशोर लोन आणि  तरुण मुद्रा या प्रकारातून ग्राहक कर्ज घेऊ शकतात.

हेही वाचा : मुद्रा लोन मिळत नाही का? तर करा 'या' नंबरवर तक्रार

एसबीआय मुद्रा लोन मार्फत देण्यात येणारे कर्जासाठी एक खास ऑफर देण्यात येत आहे. स्टेट  बँकेकडून देण्यात येणाऱ्या कर्जासाठी तुम्हाला जास्त वेळ ताटकळत राहण्याची गरज नाही. कारण एसबीआय आपल्याला फक्त तीन मिनीटात कर्ज मंजूर करुन आपल्या खात्यात पैसे पाठवते.  कर्ज घेण्यासाठी तुम्हाला बँकेतही जाण्याची गरज नाही. तुम्ही घरी बसून मुद्रा लोनसाठी घरी बसून अर्ज करु शकतात. तेपण विना कागदपत्र देता तुम्ही कर्जासाठी अर्ज करु शकतात.

कशाप्रकारे घेणार कर्ज

 • अर्जदारचा लघु उद्योग असला पाहिजे.
 • अर्ज  करणारा व्यक्ती हा एसबीआय चा  खातेधारक असणे आवश्यक असते.
 • निदान सहा महिन्याचा बँकेतील व्यवहार दाखवणे आवश्यक.
 • साधरण एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते.
 • कर्ज परतफेडीचा कार्यकाळ हा ५ वर्षाचा असतो.
 • दरम्यान बँकेच्या मापदंडानुसार, ५० हजार रुपयांचे कर्ज त्वरीत मिळते. दरम्यान काही औपचारिक कामे पुर्ण करण्यासाठी बँकेत जावे लागेल.

५० हजार रुपयांच्या कर्जासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची माहिती

 • बचत/चालू खाते क्रमांक तसेच  शाखेची माहिती द्यावी.
 • असलेल्या व्यवसायाची माहिती देणे आवश्यक
 • व्यवसाय का प्रमाणपत्र  ( नाव, सुरू होण्याची माहिती आदी)
 • आधार  क्रमांक ( आधार कार्ड बँक खात्याशी जोडणे आवश्यक आहे)
 • जात प्रमाणपत्र 
 • जीएसटीएन आणि उद्योग आधार क्रमांक देणे आवश्यक
 • दुकान किंवा व्यवसाय कधी सुरु केला त्याची नोंदणीचे कागदपत्र

दरम्यान ५० हजार ते १ लाख रुपयांच्या कर्जासाठी  अर्जदाराचे ज्या शाखेत बचत किंवा चालू खाते असेल त्या शाखेत जाऊन कागदपत्रांवर स्वाक्षरी करावी लागेल. औपचारिक कामे पुर्ण झाल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एसएमएस येईल. त्यात कर्ज प्रक्रियाविषयी माहिती दिलेले असेल.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters