1. बातम्या

कमी खर्चात भरघोस उत्पन्न देणारे शतावरी पीक; अशी करा लागवड

आजचा शेतकरी नाविन्नपूर्ण आणि भरघोस उत्पन्न मिळवून देणाऱ्या पीक पद्धतीकडे वळलेला आहे. त्यामागेही कारण ही तसेच आहे; ते म्हणजे तुम्हा आम्हाला मारणारी वाढती महागाई. पारंपारिक पीक पद्धतीमध्ये तीच-तीच पिके घेऊन उत्पन्नामध्ये म्हणावा तसा उतारा आणि पैसा मिळत नाही.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
satavar best crop

satavar best crop

आजचा शेतकरी नाविन्नपूर्ण आणि भरघोस उत्पन्न मिळवून देणाऱ्या पीक पद्धतीकडे वळलेला आहे. त्यामागेही कारण ही तसेच आहे; ते म्हणजे तुम्हा आम्हाला मारणारी वाढती महागाई. पारंपारिक पीक पद्धतीमध्ये तीच-तीच पिके घेऊन उत्पन्नामध्ये म्हणावा तसा उतारा आणि पैसा मिळत नाही. त्यात रोजचा वाढणारा उत्पन्न खर्च आणि बाजारातून येणारा परतावा कमी असतो. त्यामुळे शेतकरी चोखंदळपणे नवीन पिकांची निवड करताना   दिसत आहे. नवीन पिकांमध्ये औषधी पिकांची लागवड होताना दिसते त्यामध्ये शतावरी, अश्वगंधा, मधुपर्णी, सर्पगंधा, इसाबगोल, कालमेघ, शेवगा (फक्त पाने), गिलोय, अडुळसा, तुळशी आदींची लागवड केली जाते.

कृषी जागरणच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या फायद्याची असणाऱ्या औषधी वनस्पतींच्या शेतीबद्दल माहिती उपलब्ध करून देत असतो. त्यातील आज आपण शतावरी पिकाबद्दल माहिती करून घेऊया. शतावरी म्हटलं की, आपल्याला औषधी वनस्पती आठवते आणि एवढचं माहिती असते की, ही शतावरी आपल्याला  जंगलामध्ये मिळते. पण शेतकरी बांधवांनो या शतावरीची आपल्या शेतामध्ये लागवड करता येते, तेपण कमी खर्चात. आजकाल बरेच शेतकरी या औषधी शतावरीची करार पद्धतीने शेती करताना बघायला मिळतात आणि भरघोस नफाही कमावत आहेत.

 तसे पाहिले तर औषधी वनस्पतीची शेती ही काही नवीन संकल्पना नाही. कारण काही वर्षांपूर्वी शेतकऱ्यांनी करार पद्धतीने  कोरपड पिकाच्या शेती केली होती. पण काही ठिकाणी शेतकऱ्यांना योग्य बाजारपेठ मिळाली नसल्याने त्यांना आर्थिक फटका बसला. कोरपडच्या बाजारपेठांची निश्चिता नसल्याने शेतकरी शतावरी लागवडीकडे वळाले आहेत. खूप कंपन्या आहेत, ज्या करार तत्वावरती शेती करण्यासाठी तयार आहेत आणि हमखास नफाही पण मिळवून देतात. औषधी वनस्पतींची बाजारात खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे.


परदेशात शतावरीची मोठ्या प्रमाणात आयात केली जाते. आपल्याकडे मागणी अधिक असल्याने यातून आपल्याला नफा नक्कीच मिळणार यात शंका नाही. शतावरीच्या लागवडीसाठी कमी खर्च येत असल्याने याची शेती आपल्याला फायद्याची ठरते.   शतावरीच्या वाणांमध्ये ३०० पेक्षाही अधिकच्या जाती पाहायला मिळतात पण त्यामध्ये फक्त दोन प्रकारच्या शतावरीची शेतीसाठी लागवड फायद्याची ठरते. पहिली आहे देशी शतावरी -  हिच्या मुळ्या पांढऱ्या रंगाच्या असतात. औषधी गुणधर्म कमी असल्याकारणाने तिला बाजारात भाव कमी मिळतो. पण उत्पन्न जास्त असते. दुसरे वाण आहे पिवळी शतावरी (नेपाली) - याचे मुळ पिवळ्या रंगाचे असतात आणि यामध्ये औषधी गुणधर्म जास्त असतात.  त्यामुळे या वाणाला बाजार भाव चांगला मिळतो.

जमीन आणि हवामान- या पिकाच्या लागवडीसाठी सर्व प्रकारची माती चालते. पण वाळूमिश्रीत पोयट्याची, लाल किंवा काळी जमीन अधिक चांगली असते. मातीत पाण्याचा निचरा होत असेल, सेंद्रिय घटकांचे प्रमाण चांगले व २०-३० सेंमी भुसभुशीत अशी जमीन असावी. या पिकासाठी उष्ण किंवा समशीतोष्ण वातावरण चांगले मानवते. दुष्काळी भागात त्याचबरोबर थंड वातावरणात पण पीक येऊ शकते.

पूर्वमशागत- लागवडीचे क्षेत्र निवडताना शक्यतो जमीन भुसभुशीत असावी. उन्हाळ्यामध्ये खोल नांगरणी करून २०-२५ टन चांगले कुजलेले शेणखत घालून घ्यावे. रोटावेटरने किंवा डिस्क हॅरोने ढेकळ फोडून घ्यावीत. पाऊस पडल्यानंतर कुळवणी करून ६० सेंमी अंतराच्या सऱ्या काढून घ्याव्यात.

लागवड- मान्सून हंगामात (जून-ऑगस्ट) तयार केलेल्या सरी-वरंबा पद्धतीचा लागवडीसाठी वापर करावा. शतावरीची वंशवृध्दीसाठी १ किलो बियाणे प्रती हेक्टर, गड्यांच्या फुटव्यापासून किंवा ओल्या मुळ्यापासून पण रोपे तयार केली जातात. दोन सऱ्यांमधील अंतर ६० सेंमी ठेवावे. त्याचबरोबर सरी वरंब्याची उंची ज्यास्त चढवून घ्यावी कारण याची मुळ्या १-१.५ फुटापर्यंत खोल जातात, त्या हिशोबाने ६० सेंमीपर्यंत वरंब्याची उंची करून घ्यावी कारण काढणीला त्रास होत नाही. दोन रोपांमधील अंतर ६० ते ७५ सेंमी ठेवावे.

हेही वाचा:डिसेंबरमध्ये एलपीजी अनुदान दिले जाईल, एलपीजी सिलेंडरवर ग्राहकांना दिलासा मिळणार आहे


अन्नद्रव्य पुरवठा- जमिनीच्या प्रकारानुसार आणि मातीतील उपलब्ध खतांच्या तपासणी अहवालानुसार खतांचे नियोजन करावे. साधारणत ६०:८०:१०० किलो नत्र:स्पुरद:पालाश विभागून द्यावे. लागवडीच्या सुरुवातीला आर्धी खताची मात्रा दयावी. राहिलेली मात्रा पिकाच्या वाढीच्या गरजेनुसार द्यावी. औषधी वनस्पतीच्या लागवडीसाठी शक्यतो सेंद्रिय खतांचा वापर करावा.  त्यामध्ये शेण व गोमुत्राची स्लरी, वर्मिवॅशचा वापर उत्तम.

पाणी व्यवस्थापन- सुरवातीच्या काळामध्ये या पिकासाठी पाण्याची आवश्यकता भासते, जर ठिंबक सिंचनाने पाणी द्यायची सोय असेल तर उत्तमच, नसेल तर पाट पाण्याने सुद्धा देऊ शकता. पिकांची व्यवस्थित वाढ झाल्यावर १०-१५  दिवसांच्या फरकाने जरी पाणी दिले तरी चालते. पण उन्हाळ्यामध्ये कमीत-कमी ४-६ दिवसांच्या फरकाने पाणी द्यावे.

आंतरमशागत- लागवडीनंतर बांधावरील तसेच झाडांच्या जवळील खुरपणी करून घ्यावी. तणनाशक वापरू नये. यामध्ये पांढऱ्या शातावरीला (देशी) वाढीसाठी आधाराची गरज असते, कारण हिचे वेल असतात, त्यामुळे टोमॅटो पीकसारखी बांबूच्या कट्या रोवून आडव्या तारा ओढून वेल त्यावरती सोडून द्यावेत. पिवळ्या (नेपाली) शातावारीसाठी आधाराची गरज नसते.

काढणी व उत्पन्न- शतावरीची १८-२० महिन्यामध्ये काढणीसाठी तयार होते. काढणी करण्याआधी शेतीला पाणी द्यावे व रान वापश्यावर आले की कुदळीने किंवा टिकावाने खोदून मुळांची काढावी करून घ्यावी. काढणी झाल्यानंतर मुळांना पाण्याने स्वच्छ धुवून मुळांवरची साल काढून घ्यावी. सध्या मार्केटमध्ये शतावरीच्या मुळांची साल काढण्यासाठी मशीन पण उपलब्ध आहेत. साल काढलेल्या मुळ्या पाण्याने धुवून सावलीत वळवून घ्याव्यात, कारण उन्हात वाळवल्याने त्यातील औषधी द्रव्यांचे विघटन होते. योग्य काळजी घेतलेल्या पिकांपासून १०-१५ क्विंटल सुकलेल्या मुळ्या निघू शकतात.

English Summary: satavar best crop for more income and more production; know the plantation method Published on: 13 May 2020, 06:44 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters