आपण अनेकदा बघतो की, ग्रामपंचायतीमध्ये मोठा भ्रष्टाचार होतो, त्यानंतर अनेकदा सरपंचावर कारवाई होते. यामध्ये प्रामुख्याने ग्रामपंचायतीमध्ये अपहार, भ्रष्टाचार विकासकामांत गडबड आदी कारणांमुळे सरपंचावर कारवाई करण्यात येथे, पण अक्कलकोट तालुक्यातील पालापूर ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी मुलालाच शिपाई म्हणून सेवेत घेतले, यामुळे या प्रकरणाची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे.
याबाबत सरपंच शेकप्पा म्हाल्लप्पा कलगुटगे यांनी मुलगा भद्रीनाथ शेकप्पा कलगुटगे यांनी शिपाई जलसेवक पदावर घेतले. मात्र आता याबाबत सगळा प्रकार समोर आला आहे. ३१ ऑक्टोबर २०१८ रोजीच्या मासिक सभेत ठराव सरंपच शेकप्पा कलगुटगे यांनी मुलगा भद्रीनाथ कलगुटगे यांना शिपाई म्हणून १ महिन्यासाठी नियुक्ती दिली होती. याबाबत सभा देखील सरपंचाच्या अध्यक्षतेखाली झाली होती.
याबाबत बबन जमादार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. यामुळे जिल्हाधिकारी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. याबाबत जिल्हाधिकारी यांनी सुनावणी घेतली. सुनावणीमध्ये दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेऊन जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सरपंच शेकप्पा म्हाल्लप्पा कलगुटगे यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
महावितरणच्या अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार, बच्चू कडू फोन करून म्हणाले, थोबाडीत मारल्याशिवाय..
तलाठी, अन्नपूर्णा महिला बचत गट यांच्याकडील दाखला, तहसीलदार अक्कलकोट यांच्याकडील शिधापत्रिकावरून सरपंच शेकप्पा म्हाल्लप्पा कलगुटगे यांचा भद्रीनाथ शेकप्पा कलगुटगे हा मुलगा असल्याचे सिद्ध झाले आहे. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. अनेक ठिकाणी पदाचा गैरवापर करून कामे केली जातात, असाच काहीसा प्रकार हा घडला आहे.
महत्वाच्या बातम्या;
'बंद पडलेल्या कारखान्याला धुऊन खाण्याचे काही लोकांचे काम'
आता आठच दिवसात लठ्ठपणा कमी करा, संशोधनानंतर वजन कमी करणारांसाठी आनंदाची बातमी
अजितदादांच्या शेतीविषयक अभ्यासामुळे अधिकाऱ्यांची उडाली तारांबळ, अधिकाऱ्यांपुढे प्रश्नांचा पाऊस..
Share your comments