गेल्या काही दिवसांपासून दौंड तालुक्यात भीमा पाटस करखाना चर्चेत आला आहे. गेल्या महिन्यात मुंबई येथे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दौंडमधील भीमा-पाटस साखर कारखान्यात 500 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करीत याची चौकशी करण्याची मागणी केली होती.
यामुळे एकच खळबळ उडाली होती. याबाबत मी कागदपत्रे देतो, मला वेळ द्या, अशी लेखी मागणी खा. राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली होती. त्यांच्याकडून खा. राऊत यांना कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी, त्यांनी सीबीआयकडे तक्रार करण्याचे म्हटले होते.
याबाबत संजय राऊत यांची दौंड येथे 26 एप्रिल रोजी सभा होणार आहे. पाटस साखर कारखान्याच्या 500 कोटी रुपयांच्या कथित भ्रष्टाचारावर या सभेत राऊत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पोल्ट्री मधल्या तब्बल 13 हजार कोंबड्या अवकाळीच्या फेऱ्यात मृत्यूमुखी, क्षणात झालं होत्याच नव्हतं..
याबाबत माजी आमदार रमेश थोरात, महानंदा दूध संघाच्या माजी अध्यक्षा वैशाली नागवडे यांनी खा. राऊत यांची त्यांच्या कार्यालयात मुंबई येथे भेट घेतली होती. यामध्ये या सभेबाबत चर्चा झाली होती.
या पिकाचे तेल 20 हजार रुपये प्रति लिटर, दर चार महिन्यांत 1 लाखाची कमाई..
तालुक्यात कुल यांच्या समर्थकांनी राऊत यांच्याविरोधात ठिकठिकाणी आंदोलन केले होते. हा सर्व गोंधळ पाहून थोरात यांच्या समर्थकांची खा. राऊत यांची सभा झाली पाहिजे, अशी इच्छा होती. आता या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
माजी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! आता शेतकरी मुलाशी लग्न केल्यास 2 लाख रुपये मिळणार...
कांद्याच्या अनुदानासाठी बनावट पावत्या, कारवाईची शेतकऱ्यांची मागणी...
इंदापूर तालुक्यातील शेतकरी हवालदिल, खडकवासलाचे पाणी येत नसल्याने शेती अडचणीत
Share your comments