हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे ७०१ किमीपैकी ६०० किमीचे काम पूर्ण झालेले असून, हा महामार्ग वाहतुकीस खुला करण्यात आलेला आहे. उर्वरित नाशिक व ठाणे जिल्ह्यांतील १०१ किमीचे काम प्रगतिपथावर आहे.
असे असताना या रोडवर मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. समृद्धी महामार्ग जीवघेणा ठरत आहे. हा महामार्ग व्हावा, असे देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न होते, पण हे जीवघेणे स्वप्न ठरत आहे. त्यामुळे पुढील सहा महिने हा महामार्ग बंद ठेवून त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे.
तसेच त्यातील दोष काढूनच मग हा महामार्ग सुरू करावा, अशी मागणी काँग्रेसच्या नेत्यांनी विधानसभेत केली. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी, ‘लोकसभा निवडणुकीपूर्वी या महामार्गाचे पुन्हा उद्घाटन करता यावे यासाठी घाईघाईने या महामार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळे हा अपघात घडला,’ अशी टीका केली.
तसेच प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर स्थगन प्रस्तावाद्वारे समृद्धी महामार्गावरील अपघातप्रश्नी काँग्रेसच्या नाना पटोले यांनी चर्चेची मागणी केली. हा महामार्ग शापित ठरत असून तो बंद करावा, अशी मागणी केली.
पुणे बाजार समितीला आली जाग, ९३ अडत्यांवर कारवाई, लाखांचा दंड वसूल...
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख म्हणाले, अशा प्रकारचे गर्डर लाँचिंग करत असताना अपघात होत नाही. समुद्रातील काम करत असतानाही असे अपघात झालेले नाहीत. मग इथे अपघात कसा झाला? शिवाय महामार्गावरील अपघात कसे होतात याची चौकशी केली पाहिजे.
पुणे जिल्ह्यात दोन महिन्यांत जिल्ह्यात सरासरी ७६ टक्के पाऊस, अजूनही काही तालुके पावसाच्या प्रतीक्षेत..
पीक विमा भरण्यासाठी महाराष्ट्राला केवळ 3 दिवसांची मुदतवाढ, इतर राज्यात 16 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
Share your comments