वर्धा जिल्ह्यात शहरापासून जवळच एका खेडेगावातील शेतात मंगेशी मून नावाच्या ताई पारधी मुलांकरिता एक संगोपन प्रकल्प चालवतात. रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलांना त्यांनी येथे एकत्र आणले आहे. भीक मागण्यापासून त्यांना परावृत्त केले आहे. त्यांना सन्मार्गाला लावणे, संस्कार आणि शिक्षण प्राप्त करून देणे, असे कार्य त्या करत आहेत. दोन दिवसापूर्वी त्यांच्याकडून मला खालील संदेश प्राप्त झाला होता.
आम्हाला हवी आहे कुलरची मदत
"विदर्भातील उन्हाळा आपल्या सर्वांना माहीती आहे. 47℃ डिग्री तापमान त्यात मुलांची खुप खातर..
ऊन इतकी सकाळीच नऊ नंतर बाहेर पडन कठीन, वरून टिनपत्रे हाँल मध्ये तर अस वाटायला लागते कि आग आहे. मुलं आपली कुठेतरी झाडाच्या सावलीत दिवस काढतात पण रात्र मात्र अतिशय कठिण होत गरमीने झोप लागत नाही. आणि जंगलाचा भाग असल्याने बाहेर झोपता येत नाही. उन्हाळ्यात मुलांचे खुप हाल होतात. त्यामुळे तब्येती पण खुप खराब होतात आहे . आम्हाला कुलरची मदत मिळाली तर आमचा उन्हाळा खुप आनंदाने जाईल.आपल्या मदतीची आम्हाला अत्यंत गरज आहे.
मुलांकरिता कुलर उपलब्ध व्हावेत म्हणून सहृदयी महसूल अधिकारी आणि अन्य विभागातील काही अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्यात आला. नवल म्हणजे ज्यादिवशी सकाळी मदतीचे आवाहन करण्यात आले त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत सर्व मदत गोळा झाली. आज त्या ताईंनी मुलांकरिता चार कुलर खरेदी करून त्याचा फोटो टाकलाय. ज्यांनी मदत केली त्या अधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानले आहेत.
ज्यांनी मदत केली त्यांची नावे कुलर वर टाकण्याची इच्छा देखील त्यांनी व्यक्त केली.
याबाबत संबंधित सहृदयी अधिकारी यांना विचारणा केली असता आपण केलेली मदत ही गुप्त राहू द्यावी! नावाचा उल्लेख देखील करू नये! कोणतेही श्रेय नको! असे सर्वांनी सांगितले.
महसूल विभागातील अधिकारी आणि एकूणच प्रशासनातील अन्य विभागातील अधिकारी हे खरोखरच सहृदयी आहेत हेच या प्रसंगातून पुन्हा एकदा दिसून आलेले आहे. गरीब मुलांच्या मदतीकरिता धावून आलेल्या अधिकाऱ्यांच्या सहृदयतेला मनापासुन सलाम!
राजेश खवले
Share your comments