रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन नलवडे यांच्यासह शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली कराड ते सातारा पदयात्रा काढण्यात येणार आहे, असे म्हटले आहे. यामुळे आता चर्चा सुरु आहे.
सातारा ते मंत्रालय असा धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. खोत हे सरकारचे मित्रपक्ष असून त्यांनीच मोर्चा काढणार असल्याचे म्हटले असल्याने चर्चा सुरु आहे. यामध्ये दोन साखर कारखान्यातील २५ किमीचे हवाई अंतराची अट त्वरीत रद्द करावी. शेतकरी अथवा फार्मर प्रोडूसर कंपनीला ऊसापासून इथेनाॅल निर्मितीचे परवाने मिळावेत, काजूला हमी भाव मिळावा, काजू उत्पादक शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी.
कोकणातील बारसू येथिल प्रस्ताविका रिफायनरी प्रकल्पामध्ये प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कंपनीमध्ये भागीदार करुन द्यावे. तसेच सरपंचच्या प्रलंबित प्रश्नांकडे शासनाने सकारात्मक विचार करावा, आदी मागण्या रयत क्रांती संघटनेच्यावतीने करण्यात आल्या आहेत.
इस्त्रायलला शेती अभ्यासाचे आमिष दाखवून पुण्यातील संस्थेचा शेतकऱ्यांना 51 लाखाचा गंडा
तसेच देशात अनेक कायदे हे शेतकरी विरोधी आहे. असे कायदे रद्द करून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यावेत. महाविकास आघाडी सरकारने बंद केलेला संत शिरोमणी शेतकरी आठवडी बाजार पुन्हा सुरू करुन शेतकऱ्यांना त्यांचा माल कुठेही विकण्याची परवानगी द्यावी, अशा अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत.
काळ्या टोमॅटोपासून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, जाणून घ्या त्याची लागवड आणि खासियत
रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन नलवडे यांच्यासह शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. यामुळे सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या राज्यातील सरकार शेतकऱ्यांना मोफत बियाणे देणार, लाखो शेतकऱ्यांना होणार फायदा
काळा पेरू ठरतोय फायदेशीर, औषधी असल्याने मागणीही जास्त...
हे सरकार गाई पाळणाऱ्यांना दरमहा देणार पैसे, संस्कृती नष्ट होत असल्याने घेतला निर्णय..
Share your comments