देसाईगंज तालुक्यात वीज कोसळून अख्खं शेतकरी कुटुंबच ठार झाले. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना वडसा-कुरखेडा मार्गावरील दूध डेअरी जवळ घडली. या घटनेमुळे अवघे समाजमन सुन्न झाले आहे.
राजगडे कुटुंब गरगळा येथून लग्न लावून येत असताना मार्गातच हलक्या पावसाची सुरुवात झाली. लगेच विजांचा कडकडाट सुरू झाला. वीज कडाडत असल्याने राजगडे कुटुंबाने दूध डेअरी जवळ एका झाडाखाली आश्रय घेतला.
असे असताना अचानक वीज अंगावर कोसळल्याने कुटुंबातील चारही जण जागीच ठार झाले. देसाईगंज पोलिसांनी घटनास्थळ गाठून चारही जणांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात पाठविले. मात्र ते मृत्युमुखी पडले होते.
शेतकऱ्यांनो खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना
भारत लक्ष्मण राजगडे रा. आमगाव, ता. देसाईगंज, त्यांची पत्नी अंकिता राजगडे हे दोघेही पती-पत्नी आपल्या दिव्यांशी व मनस्वी या कोवळ्या लेकरांसह मृत्यूमुखी पडले. पुढील तपास पोलिस निरीक्षक रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
आता उपचारासाठी मोदी सरकार देणार 5 लाख रुपये, असा घ्या लाभ..
सध्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फटका बसत आहे. अनेकजण आत्महत्या देखील करत आहेत. अशातच अशा घटना घडत आहेत.
खाद्य तेलाचे दर वाढणार की कमी होणार, जाणून घ्या..
बंपर कमाई! याठिकाणी शेतकरी एका खास पद्धतीने भेंडी पिकवतात, दर 100 रुपये किलो, जाणून घ्या..
पुढचे चार दिवस अतिमहत्वाचे, महाराष्ट्रात पाऊस थैमान घालणार..
Share your comments