भारतात जेवणात तेल व मसाल्यांचा सर्वाधिक वापर केला जातो. प्रत्येक पदार्थ बनवताना तेल मोठ्या प्रमाणात वापरले जाते. भारतातील भाज्या व अन्य पदार्थ हे तेलाशिवाय बनत नाहीत. या कारणामुळे देशाततेलाची मागणी वाढत जात आहे. रशिया युक्रेन युद्धाचे (Russia-Ukraine war) परिणाम दिसायला लागले आहेत. आपल्या देशात अनेक गोष्टीचे दर वाढले आहेत.
रशिया यूक्रेन यूद्धामुळे सूर्यफुल व सोयाबीन तेलाचे भाव वाढले आहेत. यावर उपाय म्हणून भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील लोकांनी पुन्हा करडई तेलाला पसंती दर्शवली आहे. भंडारा जिल्ह्यातील सामान्य लोकांनी पुन्हा एकदा करडई तेल वापरण्यास सुरूवात केली आहे. विशेष म्हणजे भविष्यात करडई तेल इतर तेलांना उत्तम पर्याय असेल.
हे ही वाचा : ठाकरे सरकारने अखेर निर्णय घेतलाच!! शेतकऱ्यांना कोर्टकचेरीतून मोठा दिलासा..
भविष्यात करडई तेल उत्तम पर्याय
पाम तेलात 20 रूपयांची, सूर्यफुल तेलात 25 रूपयांची, सोयबिन तेलात 20 रूपयांची शेंगदाना तेलात 15 रूपयांची वाढ झाली आहे. तेल हे आवश्यक वस्तु झाल्याने तेलाची मागणी वाढली आहे. मात्र वाढते भाव लक्षात घेता करडई हे उत्तम पर्याय ठरणार आहे.
भविष्याचा विचार करता, भंडारा जिल्ह्यात करंडई उत्पादन वाढले आहे. भंडारा जिल्ह्यात करडई तेलाचा वापर वाढला आहे. तेलाच्या तुलनेत करडईचे तेल स्वस्त आहे. भविष्याचा वेध घेतं जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी करडईची लागवड करण्यास सुरुवात केली आहे.
Share your comments