1. बातम्या

थेट लाभ हस्तांतरण व्यवस्थेमार्फत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 49 हजार 965 कोटी रुपये

KJ Maharashtra
KJ Maharashtra
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना

संपूर्ण देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट लाभ हस्तांतरण व्यवस्थेमार्फत 49 हजार 965 कोटी रुपये जमा करण्यात आल्याची माहिती अण्णा आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव सुधांशू पांडेय यांनी दिली. वर्च्युअल कॉन्फरन्सच्या माध्यमातून प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना- तिसरा टप्पा आणि एक देश एक शिधापत्रिका या दोन योजनांच्या अंमलबजावणीची पांडेय यांनी यावेळी माहिती दिली.

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना विषयी सांगताना त्यांनी म्हटले की, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने मे आणि जून या दोन महिन्यांसाठी या योजनेच्या अंमलबजावणी सुरू केले आहे. ही सदरची अंमलबजावणी पूर्वीच्या पद्धतीनुसार होत असून लाभार्थी कुटुंबांना प्रतिव्यक्ती दरमहा पाच किलो धान्य( गहू आणि तांदूळ) मोफत दिले जात आहे. ही मदत अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत मिळणाऱ्या अन्नधान्य या व्यतिरिक्त आहे.

 

अन्न सुरक्षा योजना आणि अंत्योदय अन्न योजना तसेच प्राधान्यक्रम आतील कुटुंबे अशा सर्व योजनांच्या सुमारे 80 कोटी लाभार्थ्यांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना च्या तिसऱ्या टप्प्यातील लाभ मिळत आहे. केंद्र सरकार या योजना साठीच्या अनुदानाचा सगळा खर्च तसेच राज्यांना अन्नधान्याच्या वाहतुकीसाठी येणारा खर्च असा एकूण 26 हजार कोटी रुपये खर्च वहन  करणार आहे. मे महिन्यातील अन्नधान्याचे वितरण नियोजित कार्यक्रमानुसार होत आहे.  10 मे 2021 पर्यंत भारतीय अन्न महामंडळ कडून 34 राज्य / केंद्रशासित प्रदेशांनी 15.55 लाख मेट्रिक टन अन्नधान्य उचलले आहे.

 

तसेच राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांनी आतापर्यंत दोन कोटी लोकांना एक लाख मेट्रिक टन पेक्षा जास्त अन्नधान्याचे वितरणही केले आहे. वन नेशन वन रेशन ही योजना आता 32 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात लागू झाली आहे. या योजनेअंतर्गत दर महिन्याला सरासरी 1.5 ते 1.6 कोटी अर्ज स्थानंतरण व्यवहार प्रक्रियेसाठी येतात असेही पांडेय यांनी सांगितले.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters