
Rose farming
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्याच्या कळस येथील धनंजय मोहोळकर यांनी आपल्या शेतात गुलाबाची लागवड केली. त्यांनी शेतीमध्ये बदल केला आहे. केवळ दहा गुंठ्यात त्यानी गुलाब लागवड केली असून आता त्यांना खर्च वजा करता दर आठवड्याला 7 हजार पर्यंतचे उत्पन्न मिळत आहे.
यामुळे त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाला असून त्यांच्या प्रयोगाचे परिसरात कौतुक केले जात आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक देखील केली नाही. त्यांनी जानेवारीत गुलाबाची लागवड केली. चार फूट अंतरावर दोन फुटाचा पट्टा तयार करून त्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट आणि कंपोस्ट खत मिक्स करून वरंबा तयार केला.
यानंतर मग ठिबक टाकले. नंतर ठिबकने पाणी देऊन वरंबा ओले केले. मग अडीच फुटावर गुलाबाच्या कलमांची लागवड केली. त्यांनी ग्लॅडिएटर या वाणाचे गुलाब लावले आहे.
हेडफोनशिवाय व्हिडिओ पाहिल्यास तुरुंगवास आणि 5000 रुपयांचा दंड, राज्यात नवीन नियम..
ते आपल्या शेतात मजूर लावत नाहीत, तर त्यांचा परिवार गुलाब शेतीमध्ये मेहनत घेत आहे. यामुळे त्यांचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. एका दिवसाआड सध्या 200 डझन पर्यंत गुलाबाचे उत्पादन त्यांना मिळत आहे.
मनरेगा सिंचन योजनेतील शेतकऱ्यांची यादी जाहीर, शेतकऱ्यांना मिळणार ४ लाखांचे अनुदान
त्यांना आतापर्यंत सर्व प्रकारचा खर्च मिळून 20 हजार खर्च आला आहे. यामुळे कमी पैशात त्यांनी चांगले उत्पादन घेतले आहे. यामुळे ते एक आदर्श शेतकरी ठरले आहेत.
शेतकऱ्यांनो पीक विम्यासाठी असा करा क्लेम, शेतकऱ्यांना मिळेल मदत, जाणून घ्या...
जिल्हाबंदीचा निर्णय मागे घ्या, अन्यथा...!! राजू शेट्टी यांचा थेट इशारा
ही इलेक्ट्रिक स्कूटर चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही, किंमत खूपच कमी, जाणून घ्या..
Share your comments