सध्या 2024 विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. यामुळे यामध्ये इच्छुकांनी तयारी सुरी केली असून गावच्या पारावर याबाबत कोण बाजी मारणार याची चर्चा सुरू आहे. सध्या राज्यात पुन्हा एकदा भाजपचे सरकार आले आहे.
यामुळे आता 2024 ला आमदार होण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. निवडणुकीत अजून बराच कालावधी असला तरी आतापासूनच तयारी सुरू झाली आहे. कार्यकर्ते देखील आतापासूनच पैंज लावत आहेत.
यामध्ये आगामी विधानसभेला कर्जत-जामखेड मतदारसंघातून कोण बाजी मारणार, याबाबत दावे प्रतिदावे केले जात आहेत. यावरून दोन कार्यकर्त्यांमध्ये तब्बल एक लाख रुपयांची पैज लागली आहे. यामुळे याची राज्यात चर्चा सुरू झाली आहे.
आता शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार, सौर ऊर्जा प्रकल्पाना दिली चालना...
2024 मध्ये कर्जत -जामखेड मतदारसंघातून कोण जिंकणार? रोहित पवार की राम शिंदे अशी ही पैंज आहे. 2019 मध्ये रोहित पवार यांनी राम शिंदे यांचा पराभव केला होता. यानंतर अनेक राजकीय समीकरण बदलत गेले आहे.
रोहित पवार यांचे कट्ट्र समर्थक विशाल डोळे आणि राम शिंदे यांचे समर्थक जायभाये यांच्यात हा एक लाखाची पैज लागली आहे. या दोघांनीही विष्णू जायभाय या मध्यस्थी करणाऱ्या व्यक्तीकडे एक लाखाचे चेक जमा केले आहे.
महत्वाच्या बातम्या;
भाजीपाल्याचे दर पडले, शेतकरी आर्थिक अडचणीत
मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात, छातीला लागला मार
आज ‘या’ ठिकाणी कोसळणार पाऊस, हवामान विभागाचा इशारा, शेतकरी चिंतेत..
Share your comments