1. बातम्या

" सत्तेचे लुटारू, अन् लोकशाहीतील गद्दार "

सामाजिक भीषण अवस्था -भारत हा देश जाती-धर्मावर चालतो की

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
" सत्तेचे लुटारू, अन् लोकशाहीतील गद्दार "

" सत्तेचे लुटारू, अन् लोकशाहीतील गद्दार "

सामाजिक भीषण अवस्था -भारत हा देश जाती-धर्मावर चालतो की,आर्थिक धोरणावर चालतो. हेच अजून कळायला मार्ग उरला नाही ?. फक्त लुटारूचा बाजार भरलेला दिसतो आहे ? कोणीही उठला सुटला की,आपल्या जातीच्या महापुरुषांची, संत महात्म्यांची ,शूरवीरांचे नावे घेऊन, व त्यांचे फोटो सेशन करून पन्नास- शंभर लोक जमा करतो, राजकीय पक्षांच्या गुलामगिरीत व लाचारीत, जगण्यासाठी आपला नवीन पक्ष काढतो ,व तोच पक्ष सत्ताधीशांच्या दावणीला बांधून,त्यावर आपला जोडधंदा व उदरनिर्वाह चालवतो व कालांतराने थोडी राजकारणाची दुकानदारी वाढली किंवा जरा गाडी

रंगात आली की, सौदाबाजीचा दलाल बनुन, स्वतः सहित,आपला पक्षच विकून टाकतो, अशाप्रकारे गाढवांच्या बाजारात,फक्त आज कुत्रे भुंकनारे दिसतात.याच पद्धतीत राहणारे हजारो आजी व माजी आमदार- खासदार भारत देशात आहेत.There are thousands of grandmothers and ex-MLAs living in the same system in India. शासनाची तिजोरी लुटणे आणि वाटणे. म्हणजेच सत्तेतून पैसा व पैशातून सत्ता मिळविणे, एवढेच ध्येय सत्ताधीशांनी ठेवले. आताच्या पक्षात धेय्य- धोरणे नाही, त्यात आर्थिक मांडणी व नीतिमत्ता नाही. फक्त जाती - जातीचे पक्ष तयार केलेत . त्यात मग प्रत्येक चोनक्याला वाटायला लागले मीच का आता मागे राहावे, कारण शासनाच्या तिजोरीत जमा होत असलेला डल्ला व गल्लाच फक्त डोळ्यांसमोर दिसतो, आणि त्यामुळेच लुटारू व दरोडेखोर

राज्यकर्ते तयार झाले.शेतकरी, शेतमजूर, गिरणी कामगारांच्या घामातून व टॅक्स मधून जमा होणाऱ्या तिजोरीच्या भरोशावर पक्ष प्रतिनिधींनी कमावलेल्या प्रॉपर्टीज, जनतेच्या नजरेत भरत आहे .त्यांनी चोरलेल्या तिजोरीचा हिशोब आज ईडी घेत आहे. म्हणून कष्ट करून जगण्यापेक्षा दादागिरी, हुकूम शाही, भ्रष्टाचार, लाचलुचपत व भामटे गिरीची ताकद आजमावून पाहण्यासाठी सर्व छोटे-मोठे पक्षांच्या दररोज निवडणूक आयोगाकडे नोंदी होत आहेत. शेतकरी व्यवस्थेची उंची व खोली माहीत नसल्यामुळे नुसतं शेतकऱ्यांचं नाव घेऊन दुकानदारी थाटणारे, पक्षाचे प्रतिनिधी जनतेसमोर हल्लाबोल करून कल्लोळ माजवीत आहे. ध्येय व उद्दिष्ट माहित नसणाऱ्या अनेक सत्ताधीशांच्या नवीन पाळीव

शेतकरी संघटना तयार होत आहे. धर्माच्या,देवाच्या, व मठाच्या नावावर मठाधिश तयार होऊन, अब्जोच्या रकमा स्वाहा होतात. काही मंदिराचा अपवाद सोडल्यास, लुटारुंचीच फौज दिसते. या भामटेगिरीत कष्टकरी जनता लुटल्या जात आहे. हे सर्व बेवकुब बनवण्याचे षडयंत्र सुरू आहे. हे सर्व शेतीच्या लुटीतून घडत आहे. काँग्रेसच्या चुकीचे आर्थिक धोरण पुढे बीजेपी चालवीत आहे.गायीचे व माय ,माऊलीचे वास्तव्य ? --- कोणी गाईला माता म्हणून ओवाळतो , तर काही गोभक्ताच्या गोशाळा शासनाच्या अनुदानावर चालत असून प्रचंड भ्रष्टाचारीने पोखरल्या आहेत.जनतेला

फक्त गायी बद्दलची करुणा व भावना डोळ्यासमोर दिसते. परंतु शेतात बैलांन केलेली कष्ट, व आपल्या बापाने मुला बाळासाठी वाहिलेले प्रपंचाचे ओझे, हे मात्र आजच्या तरुण पिढीला दिसत नाही ? दुःख गाणाऱ्या मायेची ममता दिसते. पण घरातल्या सत्तेसाठी, प्रॉपर्टीतल्या हिष्यासाठी ,पैशासाठी वाद घालणारी, व बापाले तुडवणारी तरुण पिढी मात्र आज तयार होत आहे.त्यांना बापाच्या कष्टाचा विसर पडला आहे. तसेच प्रशासनातील क्रूरकर्मे हे जर आपल्या बापाचेच होत नाही, तर हे सत्तापिपासू जनतेचे कसे होणार ? संपूर्ण प्रशासन भ्रष्टाचाराने बोकळलेले आहे. 

लुटारुंची वाटचाल - मागील काळात शेतकऱ्यांच्या धान्याचे खळे लुटण्यासाठी लुटारू व दरोडेखोर शेतात येऊन खळे लुटून जात होते, त्याच प्रकारे शासनाची तिजोरी लुटण्यासाठी आता जाती, धर्माच्या टोळ्या तयार होऊन एकमेकात भांडून ,कुरघोडी करीत आहेत. आणि कष्टकऱ्यांच्या आत्महत्या घडवून शासनाच्या तिजोऱ्या पळवायला लागलेत. आज हिंदुत्वाची गरज नाही, तर बंधुत्वाची गरज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले , राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, यांनी भारत देशाला स्वराज्य, सुराज्य, समता व बंधुत्वाची शिकवण दिली. काँग्रेस चा इतिहास स्वातंत्र्याची चळवळ म्हणून नावलौकिकास

होती. धर्मनिरपेक्ष म्हणून तिने साठ वर्षे सत्ता भोगली,आणि या देशात प्रचंड घोटाळे करून भ्रष्टाचार वाढविला. ग्रामीण भागात सिलिंग आणून राजे राजवाडे तोडले. मात्र शहरी प्रॉपर्टीला कुठेही सिलिंग लावले नाही. खानदानी लोकांना सत्तेत आणून बरबाद केले. कारण त्या काळात देशभक्त व देशाभिमानी लोक होते. जनतेच्या कल्याणासाठी स्वतःच्या प्रॉपर्टी विकून बरबाद झाले. मात्र त्यातील काही संधीसाधू यांनी चाणाक्ष राहून,पुढे पंचवीस पिढ्या घरी बसून खातील एवढी माया जमवली , व त्यावर गुंडेगिरी पोसून दहशत माजवली. जमा झालेला पैसा स्विस बँकेत अथवा बाहेर देशात गुपचुप

पाठविला गेला. जनतेणे उघड्या डोळ्यांनी हे तमाशे बघीतले व हात चोयत बसली .आज हिंदुत्वाच्या नावावर मोठा मासा, लहान माशाला खात आहे. ही कसली हिंदू शाही. जबरदस्तीने सत्ता मिळविण्या साठी हिंदूराजाचे तमाशे सर्व जगात दिसत आहे. गरिबी हटाव, अच्छे दिन म्हणून लुटारूंनी राज्य चालवले आहे.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात-सत्तेसाठी हपापावे, वाटेल तसे पाप करावे जनशक्तीस पायी तुडवावे,ऐसे चाले स्वार्थासाठी l l -ग्रामगीता.शेतकऱ्यांची वाताहत - शेतकऱ्यांच्या आत्महत्या व आर्थिक विषमता हे प्रश्न मागे पडत चालले .

आतापर्यंत पक्षांतर विरोधी कायदे कित्येकदा बदलले , आणि सर्वच पक्षांनी आपापल्या सोयी प्रमाणे पुन्हा करून घेतले. तर मग शेतकऱ्यांच्या विरोधी असलेले कायदे,किंवा त्यांच्यासाठी हिताचे व सोईचे कायदे या देशात आमदार, खासदार यांनी का तयार केले नाहीत ? हा मोठा गहन प्रश्न आहे?. म्हणजेच शेतकऱ्यांच्या राजरोसपणे आत्महत्या घडवायचा हा तर यांचा स्पष्ट कुटील डाव दिसत आहे.५) पक्षांतर धोरण, जनतेची धूळफेक --हिंदूंचेच राजे जर हिंदूंच्याच बंडखोर नेत्यांना केंद्रातून संरक्षण दिल्या जाते. जबरदस्तीने सत्तापालट केल्या जातो. हिंदूंच्या मतांच्या भरोशावर पान टपरी वाले,

ऑटो चालवणारे, पेंटर ,हॉटेलचे कामगार, अशी सामान्य माणसे ज्यांना आर्थिक धोरण कळत नाही, सामाजिक दृष्टिकोन नाही, बौद्धिक क्षमता नाही, तरी समाजाने हिंदूंच्या नावावर आमदार, खासदार, मंत्री बनवीलेत, ज्यांची लायकी नव्हती तेच आता सर्व समाजाला वेठीस धरीत आहेत. जनतेच्या मतदानाचे मोल पक्षांतर बंदी कायद्यामुळे संपत चालले आहे. शेतकरी संघटनेची आर्थिक, बौद्धिक व सामाजिक ज्ञान असलेली व्यक्तिमत्वाची जाण असलेल्या कार्यकर्त्यांना व नेत्यांना हा समाज सत्तेच्या बाहेर फेकत आहे.आज आर्थिक विषमता दूर करण्यासाठी

ज्याची खरंच गरज आहे. त्यांना दुर्लक्षित केल्या जात आहे व सत्तेच्या तिजोरीवर राजकीय पक्ष आपले बैल पोसत आहे. या सर्व विषमतेचा विचार करावा लागेल.ॲड. उज्वल निकम साहेब म्हणतात-" सध्याचे गलिच्छ राजकारण लक्षात घेता, पक्षांतर बंदी कायदा सक्षम करणे गरजेचे आहे."उदा.- एकाच्या घरी नांदायचे, दुसऱ्याचे मंगळसूत्र घालायचं, उखाणा तिसऱ्याचा घ्यायचा , आणि गर्भ चौथ्याचा वाढवायचा , अशी समाजद्रोही नीतिमत्ता,जर चालत असेल तर जनतेने कोणाकडे बघावे.आज तरी अशी विचित्र परिस्थिती राजकारणात तयार झाली आहे. पक्षांतर बंदी कायद्या

मुळे पक्ष प्रतिनिधी हाय कमांडचे बटिक , लाचार व गुलाम बनले आहे. ही वस्तुस्थिती दिसत आहे. यामुळे शासनाच्या तिजोरीचा बट्ट्या बोळ व जनता घायाळ होत आहे.आंधळी दळत आहे, व कुत्र पीठ खात आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात- " जोपर्यंत तुम्ही एकत्र होत नाही, तोपर्यंत तुम्ही गुलामच" .म्हणूनच म्हणावेसे वाटते की , शाहू, फुले,आंबेडकरांच्या, म्हणजेच शेतकरी संघटने च्या विचाराचे राज्य जर यादेशात आले नाही, तर जनतेला व शेतकऱ्यांना गुलामीच पत्करावी लागेल.

                                             

धनंजय पाटील काकडे. 9890368058

विदर्भ प्रमुख- शेतकरी संघटना

मु.- वडूरा, पोस्ट- शिराळा, तालुका- चांदूरबाजार, जिल्हा- अमरावती( महाराष्ट्र)

English Summary: "Robbers of power, and traitors to democracy" Published on: 26 August 2022, 02:38 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters