
रिसोड पंचायत समितीच्या भोंगळ कारभारा विरोधात कार्यालयाला ठोकले कुलूप.
काँग्रेसचे सदस्य राहूल बोडखे यांच्या नेतृत्वात आंदोलन.
शासनाच्या नियमानुसार प्रपत्र ड प्रमाणे सर्वे करण्यात आला होता.या सर्वे मध्ये पात्र असलेले लाभार्थी अपात्र दाखविण्यात आले असून गरजूंना डावलून पैशाची देवाणघेवाण करून तालुका भर सर्वे करण्यात आल्याची तक्रार राहूल बोडखे यांनी केली आहे.रोजगार हमी ,घरकुल योजना आणि इतरही कामे पैशाची देवाण घेवाण केल्याशिवाय होत नसून या पंचायत समितीच्या त्रासाला कंटाळून
पंचायत समिती कार्यालयाला कुलूप ठोकून प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यात आला .रोजगार हमी अंतर्गत चालू असलेले कामामध्ये सिंचन विहिरी असतील फळबाग लागवड योजना असेल पैसे द्या आणि आपलं काम करून घ्या असा प्रकार या पंचायत समितीत चालू आहे.सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या कामासाठी असलेल्या या संस्थेला भ्रष्टाचाराने वेढलेले आहे.नवीन गटविकास अधिकारी रुजू होऊन आज महिना झाला तरी शेकडो प्रकरणे गटविकास अधिकाऱ्यांच्या लॉगिनला पडून आहेत वेळोवेळी
सांगून सुद्धा कोणताही अधिकारी पैशाशिवाय काम करायला तयार नाही.सत्ताधाऱ्यांच्या आणि प्रशासनाच्या मिलीभगत मुळे हे सर्व त्रास चालू आहे असे प्रतिपादन पंचायत समिती सदस्य राहूल बोडखे यांनी केले. यावेळी पं.स.सदस्य गजानन बाजड
पं.स सदस्य नरवाडे , जनार्दन बाजड, रामु बाजड विजय बाजड ,राजू बाजड आणि नावली , लेहनी, मांडवा आणि तालुक्यातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.
शासनाच्या नियमानुसार प्रपत्र ड प्रमाणे सर्वे करण्यात आला होता.या सर्वे मध्ये पात्र असलेले लाभार्थी अपात्र दाखविण्यात आले असून गरजूंना डावलून पैशाची देवाणघेवाण करून तालुका भर सर्वे करण्यात आल्याची तक्रार राहूल बोडखे यांनी केली आहे.
Share your comments