1. बातम्या

मोदींनी पाठवलेले किसान निधीचे पैसे परत करा, अपात्र असल्यास येईल अंगलट, 'अशी' आहे प्रक्रिया..

शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजना सुरु केली. असे असताना मात्र यामध्ये अनेकजण पात्र नसताना देखील अनेकांनी या योजनेचा लाभ घेतला. यामुळे आता त्यांच्याकडून ही रक्कम वसूल केली जाणार आहे

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
Return the money of Kisan Nidhi sent by Modi goverment.

Return the money of Kisan Nidhi sent by Modi goverment.

मोदी सरकारने अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजना सुरु केली. असे असताना मात्र यामध्ये अनेकजण पात्र नसताना देखील अनेकांनी या योजनेचा लाभ घेतला. यामुळे आता त्यांच्याकडून ही रक्कम वसूल केली जाणार आहे. यामुळे आता याबाबत कारवाई सुरु आहे. या योजनेचा गैरफायदाही अनेकांनी घेतल्याचे समोर आले आहे. ही योजना केवळ अल्प किंवा अत्यंल्प भूधारक शेतकऱ्यांना आहे.

या योजनेमध्ये गेल्या 6 वर्षामध्ये कोट्यावधी शेतकऱ्यांना आर्थिक लाभ घेतला आहे. या योजनेचा लाभ घेताना काही अटी घालण्यात आल्या होत्या. यामध्ये जे आयकर अदा करतात किंवा शासकीय नौकरदार आहेत, त्यांना याचा लाभ घेता येत नव्हता. मात्र त्यांनीही योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांना आता हे महागात पडणार आहे. त्यांना ही रक्कम परत करावी लागणार आहे

या व्यक्तींना आता पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरुनही परतावा करता येणार आहे. त्यामुळे तुमचे नावही गुपित राहिल आणि सरकारचा उद्देशही साध्य होणार आहे. पैसे परत देण्यासाठी अनेकांना वेगळे वाटत असल्याने आता हा देखील एक मार्ग असल्याचे सांगण्यात आले आहे. अशा अपात्र लाभार्थ्यांचा शोध तर प्रशासकीय पातळीवर सुरुच आहे.

आतापर्यंत सरकारने शेतकऱ्यांना पीएम किसानचे 10 हप्ते पाठवले आहेत. अनेक गरीब शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे. जे अपात्र आहेत, त्यांच्यासाठी पीएम किसान योजनेच्या pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे. येथील होमपेजवरच Former Corner च्या एकदम खाली तुम्हाला Refund Online हा पर्याय दिसेल. या ठिकाणी आधारकार्ड, मोबाईल क्रमांक आणि खाते क्रमांक याची माहिती भरुन योजनेतील पैसे परत करता येणार आहेत, यामुळे ही देखील एक साधी प्रक्रिया आहे.

जर तुम्ही अपात्र असाल आणि पैसे परत केले नाहीत, तरी देखील तुम्हाला हे पैसे परत करावेच लागणार आहेत. सध्या महसूल विभागाच्या माध्यमातून अपात्र नागरिकांची नावे समोर येत आहेत. यामुळे सगळ्याची नावे समोर येणार आहेत. तसेच सगळ्या हप्त्याचे पैसे परत करावे लागणार आहेत. यामुळे आता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या;
स्वराज ट्रॅक्टर्सचा प्रवास आहे खूपच रंजक, शेतकऱ्यांसाठी भविष्यात आहे अनेक योजना, जाणून घ्या..
पांढऱ्या सोन्यामुळे शेतकऱ्यांसह व्यापारीही मालामाल, कापसाला ऐतिहासिक भाव..
जगात डाळिंबासाठी प्रसिद्ध असलेल्या सांगोल्यातून डाळिंब हद्दपार होण्याची वेळ, धक्कादायक कारणे आली समोर

English Summary: Return the money of Kisan Nidhi sent by Modi. Published on: 22 March 2022, 03:45 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters