राज्यात नवीन सरकार येऊन आता महिना होत आला. मात्र अजूनही मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. यामुळे हे सरकार नेमकं किती दिवस टिकणार यावरून अनेकजण वेगवेगळी वक्तव्य करत आहेत. असे असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि बीड जिल्ह्यातील राजेगावचे सरपंच डॉ. भरत चव्हाण यांनी एक ट्विट केले आहे.
यामुळे आता एकच चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, तारीख लक्षात ठेवा 30 जुलैला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) राजीनामा देणार आणि हे! असे त्यांनी म्हटले आहे. यामुळे आता हे पण सरकार पडणार की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
असे असताना त्यांच्या या ट्विटला राष्ट्रवादीच्या कोणत्याही बड्या नेत्याने दुजोरा दिला नाही. त्यामुळे 30 तारखेला नेमकं काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र महाविकास आघाडीचे बडे नेते याबाबत अनेक वक्तव्य करत आहेत. शरद पवार (Sharad Pawar) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील हे सरकार फार काळ टिकणार नाही, असे म्हटले होते.
श्रीलंकेनंतर आता इराक, आंदोलकांचा संसदेवर ताबा, देशातील परिस्थिती हाताबाहेर..
तसेच राज्यात लवरच मध्यावधी निवडणूका लागणार असे म्हंटले होते. आता मंत्रिमंडळ विस्तार देखील अजून झाला नाही. यासाठी अनेक नेते दिल्लीच्या वाऱ्या करत आहेत. एकनाथ शिंदे यांनी देखील दिल्ली दौरा केला. आता काय होणार हे लवकरच समजेल.
महत्वाच्या बातम्या;
'बांधावरुनच समजतात शेतकऱ्यांच्या समस्या, राजकारणाची वेळ नाही अन्यथा दरेकरांना...'
धनंजय मुंडे, पंकजा मुंडे , बबनराव पाचपुते यांच्या कारखान्यांना नोटिसा, रक्कम थकवल्याने आयुक्तांचा दणका
दोन कोटींहून जास्त रेशनकार्ड रद्द, मोदी सरकारच्या मोठा निर्णय..
Share your comments