1. बातम्या

Onion Subsidy : शेतकऱ्यांना दिलासा! कांदा अनुदान खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरु

नाशिक मधील शेतकऱ्यांसाठी ४३५ कोटींचे अनुदान यापूर्वीच मंजूर झाले आहे. फेब्रुवारी,मार्च महिन्यात जे सरकराने अनुदान जाहीर केले होते त्याची प्रतिक्षा अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना होती.

Onion Subsidy News

Onion Subsidy News

Nashik Onion News :

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील एक लाख ७२ हजार शेतकरी कांदा अनुदानासाठी पात्र ठरले आहे. या शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया देखील आता सुरू करण्यात आली आहे.

नाशिक मधील शेतकऱ्यांसाठी ४३५ कोटींचे अनुदान यापूर्वीच मंजूर झाले आहे. फेब्रुवारी,मार्च महिन्यात जे सरकराने अनुदान जाहीर केले होते त्याची प्रतिक्षा अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना होती. त्यामुळे सरकारने आता हालचाली करुन अनुदान वर्ग करण्यात सुरुवात केली आहे. 

फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात कांद्याचे दर घसरल्याने कांदा उत्पादकांचे मोठं नुकसान झालं. त्यामुळे या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अधिवेशनात अनुदानाची घोषणा करण्यात आली. अनुदानाच्या अनुषंगाने प्रशासनाने जिल्ह्यातील एक लाख ७२ हजार १५२ शेतकरी अनुदानासाठी पात्र ठरविले असून त्यांच्या अनुदानापोटी ४३५ कोटी ६१ लाख रुपयांचा प्रस्ताव शासनाच्या पणन विभागाकडे सादर केला आहे. 

कांदा उत्पादकांना देण्यात येणाऱ्या अनुदानात नाशिक, नगर आणि सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक रक्कम वितरित करण्यात येणार आहे.

नाशिक जिल्ह्यामधील कांदा उत्पादकांना सरकारने लादलेल्या निर्यातशुल्काने देखील अडचणीत आणले आहे. निर्यात शुल्क वाढवल्यामुळे शेतकरी संतप्त झाले होते. राज्यभरात शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते.

English Summary: Relief for farmers The process of depositing the onion Subsidy account has started Published on: 30 August 2023, 02:01 IST

Like this article?

Hey! I am ऋषिकेश चंद्रकांत काळंगे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters