देशभरात केळीला मोठ्या प्रमाणावर मागणी असते. बारामाही मागणी असलेल्या या फळाच्या दराने सध्या उच्चांकी भाव गाठला आहे. सध्या निर्यातक्षम केळी काढणीची लगबग सुरु होती. केळी निर्यातीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिक फायदा होत असतो. मात्र आता याचेच उत्पादन कमी झाल्याने केळीचे दर वाढले आहेत. विभागनिहाय एका टनास केळीला 15 हजार ते 20 हजार रुपये असा भाव मिळत आहे.
यंदा अवकाळी पाऊस, तर कधी वादळी वाऱ्याने फळबागांचे भरून न निघणारे नुकसान केले. मागीलवर्षीही अशीच परिस्थिती होती. त्यातल्या त्यात कोरोनामुळे पश्चिम महाराष्ट्रात केळी लागवड करण्यास बऱ्याच शेतकऱ्यांनी पाठ फिरवली. तसेच महापुराने शेतकऱ्यांचे बरेच नुकसान देखील झाले होते. त्यामुळे केळीची पुन्हा लागवड करण्यास शेतकरी धजावत आहेत. तर दुसरीकडे खानदेशातील केळी व्हायरसमुळे खराब होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आणि त्यामुळेच केळी फळाच्या उत्पादनात घट झाली असून त्याला उच्चांकी दर मिळत आहे.
मात्र रमजान महिन्यापासून केळीच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मध्यंतरी ओमायक्रॉनमुळे केळी दरात मोठी घसरण झाली होती यामुळे शेतकऱ्यांना बरेच नुकसान झेलावे लागले होते. कालांतराने बाजारपेठा खुल्या झाल्या. आणि तेंव्हापासून केळीच्या दरात वाढ सुरु झाली. शिवाय पश्चिम महाराष्ट्रात केळी उपलब्ध नसल्याने या भागातील व्यावसायिक सोलापूर, टेंभुर्णी, जळगाव इथून केळीची खरेदी करतात.
बातमी कामाची: राज्य सरकारने घेतला कृषीबाबत मोठा निर्णय; आता कृषी मालाला मिळेल योग्य भाव
मात्र आता या भागातही केळीचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे साहजिकच दरात वाढ झाली आहे. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पुढील दोन महिने केळीचा भाव वाढतच राहणार आहे. सध्या व्यापाऱ्यांमध्येदेखील केळी खरेदीसाठी स्पर्धा लागली आहे. तसेच बऱ्याच जणांनी खोडवा, निडवा ठेवला नाही त्यामुळे केळीच्या उत्पादनात घट झाली आहे.
रावेर तालुक्यासह जिल्ह्यात तसेच मध्य प्रदेशच्या बऱ्हाणपूर भागात कापणी योग्य केळीचे प्रमाण फार कमी आहे. आणि म्हणूनच उत्तर भारतात याची मोठ्या प्रमाणावर मागणी होत आहे. सध्या केळीला 2 हजार 200 रुपये क्विंटल असा विक्रमी भाव मिळत आहेत. विशेष म्हणजे 2016-17 नंतर पहिल्यांदाच केळीचे भाव हे दोन हजार रुपयांच्या पलीकडे गेले आहेत. म्हणजेच तब्बल सहा वर्षांनी केली फळाला असा विक्रमी भाव मिळाला आहे.
मागील काही वर्षात जून- जुलै नंतर 'सीएमव्ही' नामक विषाणूजन्य रोग आढळून आला आहे. मे अखेर व जून महिन्याच्या सुरुवातीला येणाऱ्या संभाव्य वादळात केळी फळबागांचे नुकसान होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे गतवर्षी जून-जुलै महिन्यात 25 टक्के केळी उत्पादक शेतकऱ्यांनी केळी फळाची लागवड केलीच नाही. आता केळी कापणीला आली आहेत मात्र त्याचे प्रमाण कमी आहे. तसेच रशिया- युक्रेन युद्धामुळे निर्यातीचे प्रमाणदेखील कमी आहे.
महत्वाच्या बातम्या:
शेतकऱ्यांनी केली एकी आणि त्यांचे दिवसच बदलेले; कांद्याच्या भावात अशी काही वाढ झाली की...
राष्ट्रपती पदासाठी पाच नावे चर्चेत, बड्या नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट
Share your comments