नियमित अन्नधान्याचे वाटप सुरूच राहणार

07 May 2020 09:36 AM


मुंबई:
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील (NFSA) अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना माहे मे महिन्याचे नियमित अन्नधान्याचे वाटप सुरू करण्यात आले आहे. शिधापत्रिकाधारकांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून अन्नधान्य घेण्याचे आवाहन नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबई यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना माहे मे महिन्याचे नियमित ३ किलो गहू व २ किलो तांदूळ प्रतिमाणसी रुपये २ प्रति किलो दराने गहू व रुपये ३ प्रति किलो दराने तांदुळ प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना तसेच अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारकांना ३५ किलो धान्य प्रति शिधापत्रिका रु. २ प्रति किलो दराने गहू व रु. ३ प्रति दराने तांदूळ वितरीत करण्यात येत असून आतापर्यंत ३% शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्याचे वितरण करण्यात आले आहे . 

माहे मे महिन्याच्या नियमित अन्नधान्याच्या वितरणाबरोबरच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील (NFSA) अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना प्रति शिधापत्रिका प्रतिमाह १ किलो डाळ या परिमाणात (तूरडाळ व चणाडाळ या दोन्हीपैकी एक डाळ १ किलो या कमाल मर्यादत) माहे एप्रिल व मे महिन्याची एकूण २ किलो मोफत डाळ वितरित करण्यात येईल.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजने अंतर्गत समाविष्ट न झालेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रुपये ५९०००/- पेक्षा जास्त व रूपये १ लाखापर्यंत असणाऱ्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना गह रू. ८/- प्रति किलो व तांदूळ रू. १२/- प्रति किलो या दराने प्रति माह प्रतिव्यक्ती ३ किलो गहू व २ किलो तांदूळ याप्रमाणे ५ किलो अन्नधान्याचे मे महिन्याचे वितरण दिनांक २४ एप्रिल २०२० पासून सुरू करण्यात आले असून सदर अन्नधान्याचे वितरण मे महिन्यातही सुरु राहील. आतापर्यंत तांदूळ १,४९५ मेट्रिक टन आणि गहू १,९२५ मेट्रिक टन इतक्या अन्नधान्याचे १२% शिधापत्रिकाधारकांना वितरण पूर्ण करण्यात आले आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील NFSA अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना नियमित अन्नधान्याच्या वाटपानंतर प्रतिमाणसी ५ किलो मोफत तांदळाचे माहे मे महिन्याचे वाटप दिनांक १२ मे २०२० पासून सुरु करण्यात येईल.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील (NFSA) सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांनी त्यांना शासनाकडून देय असलेल्या अन्नधान्याच्या तपशीलाबाबत शासनाच्या http://mahaepos.gov.in/SRC_Trans_Int.jsp या वेबसाइट वरील RC Details मध्ये जाऊन शिधापत्रिकाधारकांना त्यांचे शिधापत्रिकेकरीता देण्यात आलेल्या १२ अंकी SRC Number टाकून खातरजमा करावी. याबाबत तक्रार असल्यास हेल्पलाईन क्रमांक ०२२-२२८५२८१४ तसेच ई-मेल dycor.ho.mum@gov.in यावर तक्रार नोंदवावी. जर अधिकृत शिधावाटप दुकानदाराने त्यानुसार अन्नधान्य न दिल्यास त्याच्याविरूध्द कडक कार्यवाही करण्यात येईल. 

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील (NFSA) शिधापत्रिकाधारकांनी स्वत:हून त्यांचे धान्य सोशल डिस्टन्सिंगचा वापर करुन तसेच मास्कचा वापर करुन प्राप्त करुन घ्यावे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील (NFSA) तसेच एपीएल (केशरी शिधापात्रिकाधारक यापैकी एकही शिधापत्रिकाधारक अन्नधान्यापासून वंचित राहणार नाही याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना सर्व संबंधितांना देण्यात आलेल्या आहेत. अन्नधान्याचा मुबलक साठा उपलब्ध असल्यामुळे शिधापत्रिकाधारकांनी शिधावाटप दुकाना समोर गर्दी करु नये, असे आवाहन नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबई यांनी केले आहे.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना NFSA National Food Security Mission अंत्योदय अन्न योजना antyodaya anna yojana प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना pradhan mantri garib kalyan yojana
English Summary: Regular distribution of food grains will continue

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.