कृषी प्रदर्शन म्हणले की त्यामध्ये काही न काही नवनवीन गोष्टी पाहायला भेटतात. काळाच्या ओघात यांत्रिकीकरणमध्ये सुद्धा मोठया प्रमाणात बदल झालेला आहे. मात्र सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे भरवलेल्या कृषी प्रदर्शनात प्रमुख आकर्षण झाले आहे ते म्हणजे एका रेड्याचे. तुम्हाला वाटेल रेडा म्हणजे सर्वसामान्य त्यात काय नवीन तर या रेड्याचे वजन दीड टन असून याची किमंत सुमारे ८० लाख रुपये आहे. प्रदर्शनात जी गर्दी होत गेली त्याला कारण म्हणजे हा रेडा. हा रेडा मंगसळी येथील मुरा जातीचा गजेंद्र रेडा आहे. सोमवार हा प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असणार आहे. प्रदर्शनात गजेंद्र रेड्याचे एवढी चर्चा झाली आहे की लोकांची आपोआप पावले प्रदर्शनाकडे ओळत आहेत.
80 लाखाला मागणी तरीही मालकीचा ना...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आयोजित केलेल्या प्रदर्शनात मंगसुळी येथील गजेंद्र रेडा दाखल झाला होता जे की त्याचे वजन १६०० किलो आहे. गजेंद्र ला बघण्यासाठी माणसांची गर्दी उठली होती. सुमारे ८० लाख रुपयांची मागणी सुद्धा गजेंद्र ला आली होती मात्र त्याचे मालक विलास नाईक यांनी त्यास नकार दिला. आता पर्यंत चार प्रदर्शनात गजेंद्र गाजला आहे.
मुरा जातीच्या रेड्याची ही आहेत वैशिष्ट्ये...
१६०० किलो चा हा गजेंद्र रेडा म्हणल्यावर त्याचा खुराक सुद्धा तसाच असेल असा प्रश्न मनात पडला असेल. गजेंद्र दिवसाला १५ लिटर दुध तसेच ऊस, गवत आणि अनेक प्रकारचे खाद्य लागते. विलास नाईक यांच्या घरच्या म्हशी चा हा रेडा आहे. गजेंद्र ला पाहण्यासाठी हजारो किमीहुन लोक येतात. सर्वात विशेष म्हणजे गजेंद्र रेड्याचे वय फक्त ४ वर्ष आहे त्यामुळे प्रत्येक प्रदर्शनात या रेड्याला कसे सांभाळले हे मालक दाखवून देतात.
कोरोनाचे नियम पाळाच पण.. रेड्याला पहाच...
कृषी प्रदर्शन मंगवारी संपणार आहे. लोकांना जेव्हा समजले की गजेंद्र प्रदर्शनात आला आहे त्यावेळी पासून माणसांची आपोआप पावले प्रदर्शनाकडे ओळू लागली. प्रदर्शनामध्ये कोरोना च्या नियमांचे पसल्सन होत आहे. काल प्रदर्शनामध्ये डॉग शो चे सुद्धा आयोजन करण्यात आले होते.
Share your comments