1. बातम्या

येवल्यात लाल कांद्याच्या भावात घसरण; शेतकरी चिंतेत

नाशिक जिल्ह्यातील येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी हंगामातील सर्वाधिक कमी दर मिळाला. लाल कांद्याचे सरासरी बाजार भाव हे एक हजाराच्या खाली आल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
लाल कांद्याचे दर घसरले

लाल कांद्याचे दर घसरले

नाशिक जिल्ह्यातील येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी हंगामातील सर्वाधिक कमी दर मिळाला. लाल कांद्याचे सरासरी बाजार भाव हे एक हजाराच्या खाली आल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

 जर मागच्या आठवड्यापासून कांदा बाजार भावाचा विचार केला तर बाजार भावाचा आलेख हा सातत्याने खाली येत असल्याचे दिसून येत आहे. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी 8 हजार क्विंटल इतकी लाल कांद्याची विक्रमी आवक होऊन कांद्याचे बाजार भाव गडगडले.येवला कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये बुधवारी 700 ट्रॅक्टरच्या माध्यमातून सुमारे अठरा चार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. बुधवारी कमीत कमी कांद्याला 300 ते जास्तीत जास्त 1327 इतका बाजार भाव मिळाला.

 

येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंदरसुल उपबाजार आवारात 355 ट्रॅक्टर मधून सुमारे सात हजार क्विंटल लाल कांद्याची विक्रमी आवक झाली. तेथे कांद्याला किमान 300 ते कमाल 1340 इतका बाजार भाव मिळाला जर मंगळवारचा विचार केला तर बुधवारी कांद्याच्या किमान दरात 200 रुपयांनी तर कमाल दरात 116 रुपयांनी दरात घसरण झाली. 

कांदा दरात प्रत्येक दिवसागणिक घसरण होत चालल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी पसरली आहे.

English Summary: Red onion price fall down in yeola market Published on: 12 March 2021, 01:11 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters