औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण बाजारामध्ये टोमॅटो या पिकाला योग्य भाव मिळाला नसल्यामुळे तेथील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी टोमॅटो ची ट्रॉलीच रस्त्यावर टाकून दिली.यावेळी महाराष्ट्र राज्यात टोमॅटो चे पीक चांगले आले होते मात्र दर व्यवस्थित नसल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये नाराजी निर्माण झाली. दिल्लीच्या बाजारामध्ये टोमॅटो ला प्रति किलो ४० रुपये ने भाव मिळाला तर महाराष्ट्र राज्यात टोमॅटो ला प्रति किलो २-३ रुपये भाव मिळाला.
महाराष्ट्रा सर्वत्र सारखीच स्थिती:-
महाराष्ट्र मध्ये टोमॅटो ला वाढ कमी भाव भेटला की बाजारामध्ये वाहतुकीचा खर्च सुद्धा त्यामधून निघाला नाही त्यामुळे शेतकरी वर्गाने रस्त्यावर टोमॅटो फेकून दिली. ही फक्त पहिलीच वेळ नाही तर वर्षातून एकदा किंवा दोन वेळा ही वेळ ठरलेली असते.टोमॅटो चा पडता भाव बघता टोमॅटो लावणाऱ्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर संताप दिसत आहे. मागील वेळी कर्नाटक मध्ये सुदधा अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. मे महिन्यात पुण्यातील नारायण गावात शेतकऱ्यांनी टोमॅटो फेकून दिली आहेत.
हेही वाचा:चक्क या शेतकऱ्याने ढबु घ्या ढबु म्हणून संपूर्ण ट्रॉली भाजी फुकट वाटली
उत्पादन जास्त, मागणी कमी:-
अखिल भारतीय भाजीपाला उत्पादक संघाचे अध्यक्ष राम गाडगीळ यांनी एका मुलाखतीत असे सांगितले की टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत जे की उत्पादन जास्त झाले आहे आणि मागणी कमी त्यामुळे शेतकरी वर्गाला भाव भेटत नाही. टोमॅटो हे पीक नाशवंत पीक असल्याने त्याचा साठा तर होऊ शकत नाही. दिल्ली च्या बाजारामध्ये टोमॅटो ला प्रति किलो ३० ते ४० रुपये भाव मिळत आहे मात्र महाराष्ट्र राज्यात टोमॅटो ला प्रति किलो २-३ रुपये भाव मिळत आहे त्यामुळे जे मध्यस्थ व्यापारी वर्ग आहे त्यांना याचा फायदा होत आहे.
औरंगाबादच्या शेतकऱ्याच्या व्यथा:-
औरंगाबाद मधील गोविंद श्रीरंग गीते या नावाचे शेतकरी सांगत आहेत की आम्ही पाच रुपये ला कॅरेट विकत आहोत ने की त्यांना बागेसाठी १ लाख रुपये खर्च आलेला आहे. बागेसाठी गेलेला खर्च सुदधा निघत नसल्याने सरकारने टोमॅटो उत्पादन शेतकऱ्याला आर्थिक मदत करावी नाहीतर आत्महत्या शिवाय पर्यायच उरणार नसल्याचे गीते यांनी सांगितले.दिल्लीतील आझादपूर मंडईच्या बाजारात टोमॅटो चा भाव ३.२५ रुपये प्रति किलो आहे तर कमाल भाव २२ रुपये आहे. राष्ट्रीय कृषी बाजार समितीत म्हणजे ई - नाम ६०० रुपये प्रति क्विंटल भाव आहे.
Share your comments