1. बातम्या

चक्क या शेतकऱ्याने ढबु घ्या ढबु म्हणून संपूर्ण ट्रॉली भाजी फुकट वाटली

शेतकरी आपल्या शेतमालाला कमीतकमी आधारभूत किमंत का मागतो आणि त्याचे कारण काय हे दाखवून देण्यासाठी एक उदाहरण म्हणजे सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुका मधील कुंभारगाव मधील एक शेतकरी जे की त्यांचे नाव भीमराव साळुंखे.भीमराव साळुंखे यांनी त्यांच्या शेतात नि ढबु मिरची होती ती मिरचीला कसलाच भाव नसल्याने त्यांनी बाजारात फुकट वाटली. एक ट्रॉली भरून मिरची होती जे की अवघ्या १७ मिनिटं मध्ये ट्रॉली चा सफडा साफ झाला मात्र एका ग्राहकाने सुद्धा त्यांची परिस्थिती पहिली नाही जे की थोडी फार रक्कम द्यावे सुद्धा वाटले नाही.

किरण भेकणे
किरण भेकणे
Shimala mirch

Shimala mirch

शेतकरी (farmer) आपल्या शेतमालाला कमीतकमी आधारभूत किमंत का मागतो आणि त्याचे कारण काय  हे  दाखवून  देण्यासाठी  एक उदाहरण  म्हणजे सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुका मधील कुंभारगाव मधील एक शेतकरी जे की त्यांचे नाव भीमराव साळुंखे.भीमराव साळुंखे  यांनी त्यांच्या  शेतात  नि  ढबु मिरची होती ती मिरचीला कसलाच भाव नसल्याने त्यांनी बाजारात फुकट वाटली. एक ट्रॉली भरून  मिरची  होती  जे की अवघ्या १७  मिनिटं  मध्ये  ट्रॉली  चा सफडा साफ झाला मात्र एका ग्राहकाने सुद्धा त्यांची परिस्थिती पहिली नाही जे की थोडी फार रक्कम द्यावे सुद्धा वाटले नाही.

घ्या घ्या ढबू घ्या फुकट घ्या:-

भीमराव साळुंखे दरवर्षी त्यांच्या २५ गुंठे शेतात ढबु मिरचीची लागवड करतात. ते ढबु मिरची चे पॅकिंग करून मुंबई, पुणे येथील बाजार  समितीत  पाठवतात. वाहतूक, पॅकिंग व मजुरी साठी त्यांना प्रति किलो ६ रुपये खर्च येतो आणि त्यांना पंधरा रुपये प्रति किलो  दर   मिळाला  तरी  सुद्धा  त्यातून ९ रुपये  राहायचे त्यामधून ते समाधानी असायचे कारण सर्व खर्च जाऊन त्यांना तीन ते चार महिन्यात लाखो रुपये भेटायचे मात्र यावेळी भाव नसल्याने व्यापाऱ्यांनी  माल  पाठवू नये असे सांगितले आणि झाडे जगवायची असतील तर तोडा करावा लागतो त्यामुळे साळुंखे यांनी फुकट मिरची वाटप केले.

हेही वाचा:वस्त्रोद्योगाला कापूस टंचाईचे टेन्शन, दोन वर्षात साठ्यात कमालीची घट

ढबू फुकट वाटण्याचा निर्णय का घेतला:-

भीमराव साळुंखे यांच्या पुढे असा प्रश्न पडला होता की भाव तर मिळाला नाही आणि झाडे तर जगवायची आहेत मग तोडा तर आवश्यक आहे. कर तोडा नाही केला तर झाडे मरून जातील त्यामुळे त्यांनी तोडा केला आणि वाहतूक आणि मजुरीचा खर्च निघणार नाही त्यामुळे तेथील पंचक्रोशी म्हणजेच अंबक, चिंचणी, देवराष्ट्रे, मोहिते वडगाव, कुंडल येथे मिरची फुकट वाटली.

शेतकऱ्यांचं आर्थिक गणित विस्कटलं:-

कोरोनाच्या संसर्गमुळे मागील वर्षी लॉकडाउन पडले तसेच अत्ता महापूर आणि विविध संकटे आल्याने शेतकऱ्यांचा बराच शेतमाल नासुन गेला  तर  काही पिके मरून गेली. शेतकरी या संकटातून कशी तरी पळवाट काढतोय आणि सध्या पिके चांगली आल्याने शेतकरी खुश आहे  मात्र  बाजारभाव  नसल्याने  शेतकरी संताप व्यक्त करत आहे आणि जो खर्च लागवडीला गेला आहे तो तरी भेटेल अशी अपेक्षा धरून शेतकरी होता मात्र त्याची गणित च विस्कटले आहे.

English Summary: The vegetable price goes down,farmer sell free his vegetables Published on: 23 August 2021, 06:48 IST

Like this article?

Hey! I am किरण भेकणे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters