1. बातम्या

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत ३७ पदांची भरती ; मासिक वेतन मिळेल ३५ हजार

ग्रामीण भागाशी संबंधीत सरकारी नोकरीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी संधी चालून आली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अधिनियमांतर्गत पद भरतीसाठी कर्नाटक राज्यातून ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव

ग्रामीण भागाशी संबंधीत सरकारी नोकरीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी संधी चालून आली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अधिनियमांतर्गत पद भरतीसाठी कर्नाटक राज्यातून ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यामध्ये एकूण ३७ रिक्त पदे भरती केली जाणार आहेत. यामध्ये जीआयएस को-ऑर्डिनेटर, एमआरएम एक्स्पर्ट आणि लाइव्हली एक्स्पर्ट्स अशा रिक्त पदांचा समावेश आहे. या भरतीसाठी ७ सप्टेंबर २०२० रोजी कर्नाटक राज्य सरकारच्या ग्रामीण विकास आणि पंचायत राज विभागाने नोटिफिकेशन जारी केले आहे.

ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे अशा इच्छुकांनी विभागाच्या rdpr.karnataka.gov.in या ऑफिशियल वेबसाइटवर जाऊन अर्ज भरून तो सबमिट करावा. जे उमेवार नोकर भरतीबाबतची अधिसूचनी आणि अर्ज डाउनलोड करू इच्छितात ते खाली दिलेल्या डायरेक्ट लिंकचा उपयोग करू शकतात. यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत २१ सप्टेंबर २०२० आहे.

हेही वाचा : National Horticulture Board Recruitment 2020 : सिनीअर हॉर्टिकल्चर ऑफिसर, चिफ ऑपरेटिंग ऑफिसर पदासाठी भरती

विविध पदांसाठी पात्रतेचे निकष

ब्लॉक जीआयएस कोऑर्डिनेटर

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदावाराकडे बीई/बीटेक किंवा एमई/एमटेक अथवा एमसीए वा कृषी क्षेत्रातील पदविका असणे अनिवार्य आहे. यासोबतच त्याला या क्षेत्रातील दोन वर्षांचा अनुभवही असणे गरजेचे आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 ते 45 वर्षे यांदरम्यान असणे आवश्यक आहे.

 

 

ब्लॉक एमआरएम एक्स्पर्ट

या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार कृषी अभियांत्रिकी क्षेत्रात बीई अथवा बीटे अथवा सिव्हिल इंजिनीअरिंगमधील पदविकाधारक असणे अनिवार्य आहे. यासोबतच त्याला या क्षेत्रातील दोन वर्षांचा अनुभवही असणे गरजेचे आहे. या पदासाठी वयोमर्यादा २१ ते ४५ वर्षे इतकी आहे.

ब्लॉक लाइव्हलीहूड एक्स्पर्ट

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे अॅग्रीकल्चर किंवा इकॉनॉमिक्स अथवा हॉर्टिकल्चर वा अॅग्रोफॉरेस्ट्री किंवा अॅग्रोनॉमी अशा विषयांतील पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. यासोबतच संबंधित कामाचा दोन वर्षे अनुभव गरजेचा आहे. या पदासाठीही वयोमर्यादा २१ ते ४५ वर्षांच्या दरम्यान असली पाहिजे.

हेही वाचा : BEL Recruitment २०२०: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये पदवीधरांसाठी सरकारी नोकरी

जाणून घ्या किती मिळणार पगार

ब्लॉक जीआयएस कोऑरडिनेटर - ३५००० रुपये दरमहा आणि प्रवास भत्ता.

ब्लॉक एमआरएम एक्स्पर्ट – ३०००० रुपये दरमहा आणि प्रवास भत्ता.

ब्लॉक लाइवलीहूड एक्स्पर्ट – ३०,००० रुपये दरमहा आणि प्रवास भत्ता.

English Summary: Recruitment of 37 posts in Mahatma Gandhi Employment Guarantee Scheme, monthly salary will be 35 thousand Published on: 18 September 2020, 12:42 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters