1. बातम्या

BEL Recruitment २०२०: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये पदवीधरांसाठी सरकारी नोकरी

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणाईसाठी एक चांगली संधी चालून आली आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये (भेल) अंतर्गत विविध पदांसाठी भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी इच्छूक आणि योग्य उमेदवारांनी कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून यासंबंधीची परिपूर्ण माहिती घेऊ शकतात.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणाईसाठी एक चांगली संधी चालून आली आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये (भेल) अंतर्गत विविध पदांसाठी भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी इच्छूक आणि योग्य उमेदवारांनी कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून यासंबंधीची परिपूर्ण माहिती घेऊ शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ५ ऑक्टोबर २०२० आहे. दिलेल्या मुदतीनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

पदांची माहिती 

एकूण पदे : १७ पदे

पदाचे नाव :

प्रोजेक्ट इंजिनीअर I (PE-I) - १४ पदे

सिनीअर असिस्टंट इंजिनीअर (SAE) - ३ पदे

शैक्षणिक पात्रता :

उमेदवाराकडे कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठ अथवा संस्थेमधून बी. टेक/बी. ई. डिग्री असणे अनिवार्य आहे.

मासिक वेतन :

३५००० ते ५०००० रुपये प्रति महिना

निवड प्रक्रिया :

उमेदवाराची निवड भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडद्वारे (भेल) जारी केलेल्या निकषांनुसार लेखी परीक्षा आणि मुलाखत या आधारावर केली जाईल.

अर्ज कसा करावा :

इच्छूक उमेदवारांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह आपला अर्ज महाप्रबंधक (एचआर), नेव्हल सिस्टिम एसबीयू, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, जलहल्ल पोस्ट, बेंगलोर, ५६००१३, कर्नाटक या पत्त्यावर ५ ऑक्टोबर २०२० पर्यंत पाठवावेत.

महत्त्वाची सूचना :

उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रियेबाबात अधिक माहितीसाठी कंपनीची अधिकृत वेबसाईट http://www.bel-india.in/ यावर संपर्क साधावा.

English Summary: BEL Recruitment 2020: Government jobs for graduates in Bharat Electronics Limited Published on: 17 September 2020, 01:53 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters