1. बातम्या

शिक्षण खात्यातील कनिष्ठ लिपिक पदासाठी 266 जागांसाठी भरती,ऑनलाईन करा अर्ज

KJ Maharashtra
KJ Maharashtra
शिक्षण विभागातील कनिष्ठ  लिपिकांची भरती

शिक्षण विभागातील कनिष्ठ लिपिकांची भरती

सरकारी नोकरी करु पाहणाऱ्यासाठी एक सुवर्ण संधी चालून आली आहे. यामुळे या नोकरीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून मोठी घोषणा केली की, शिक्षण खात्यात  कनिष्ठ लिपिक पदासाठी 266 जागांसाठी भरती करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

त्यामुळे नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी आणि शिक्षण क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे.वर्षा गायकवाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून एक पत्रक जारी करून ही घोषणा केली. त्यामुळे नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी उत्तम संधी मानली जात आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ विभागीय मंडळातील कनिष्ठ लिपिक स्वर्गातील एकूण 266 पदांसाठी भरती होणार आहे.

आपण पाहिले की, मागील काही दिवसात पहिले राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य खात्यासाठी जवळजवळ साडेआठ हजार पदांसाठी ही भरती होणार असल्याचे घोषणा केली होती. त्याअन्वये याबाबतची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकूण 17 हजार पदांपैकी 50 टक्के पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 

या जाहिरातीच्या अधिक माहितीसाठी इच्छुकांनी www.mahapariksha.gov.in  व www.arogya.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters