MFOI 2024 Road Show
  1. बातम्या

नंदूरबार बाजार समितीत मक्याला विक्रमी दर

नंदूरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत (Nandurbar Agriculture Market Committee) सफेद मक्याला विक्रमी दर (Maize Price Hike) मिळाला आहे. यामुळे शेतकरी समाधानी आहेत. पतवारीनुसार मक्याला 2 हजार 462 ते 2 हजार 899 पर्यंत दर मिळत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळत आहे.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
Record prices for maize in Nandurbar

Record prices for maize in Nandurbar

नंदूरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत (Nandurbar Agriculture Market Committee) सफेद मक्याला विक्रमी दर (Maize Price Hike) मिळाला आहे. यामुळे शेतकरी समाधानी आहेत. पतवारीनुसार मक्याला 2 हजार 462 ते 2 हजार 899 पर्यंत दर मिळत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळत आहे.

यावर्षी नंदूरबार बाजार समितीत लाल आणि सफेद मक्याला विक्रमी दर मिळत असून शेतकरी समाधानी आहे. दररोज अडीच ते तीन हजार क्विंटल मक्याची आवक बाजार समितीत होत आहे. मक्याची आवक आणखी वाढण्याची शक्यता बाजार समितीच्या वतीनं व्यक्त केली जात आहे. असे असले तरी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

परतीच्या पावसामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं वाया गेली आहेत. त्यामुळं शेतकरी संकटात आहेत. अशातच काही शेतकऱ्यांची पिकं या पावसाच्या फटक्यातून वाचली आहेत. त्यांच्या पिकांना चांगला दर मिळत असल्यानं थोडाफार तरी दिलासा शेतकऱ्यांना मिळत आहे.

मालदांडी ज्वारीला 5001 रुपयांचा दर

पावसातून वाचलेल्या धान्याला चांगला दर मिळत असल्यामुळे शेतकरी समाधानी आहेत. बाजारपेठेत मक्याची आवक वाढण्याची शक्यता व्यापारी व्यक्त करत आहेत. मक्याची आवक वाढली तर काही अंशी दर कमी जास्त होण्याची शक्यता देखील व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

'ऊस लागवडीचा खर्च वाढला, साखर उद्योगाकडून शेतकऱ्यांचे शोषण'

सध्या नंदूरबार बाजार समितीत मक्याची आवक वाढली असून, दररोज 3 हजार क्विंटलपेक्षा अधिक मका विक्रीसाठी दाखल होत आहे. नंदूरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत मका, सोयाबीन, ज्वारी, लाल मिरची तेजीत आहे. या पिकांना चांगला दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांना फायदा होत आहे.

महत्वाच्या बातम्या;
डाळींब 251 रुपये किलो, शेतकरी मालामाल
केळीला 700 ते 1500 रुपये दर
काळ्या गव्हाची लागवड शेतकऱ्यांसाठी ठरतेय वरदान, होतोय बंपर नफा..

English Summary: Record prices for maize in Nandurbar Bazar Samiti Published on: 10 November 2022, 12:52 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters