1. कृषीपीडिया

काळ्या गव्हाची लागवड शेतकऱ्यांसाठी ठरतेय वरदान, होतोय बंपर नफा..

सध्या रब्बीची पेरणी जवळ आली आहे. यामध्ये चांगली थंडी पडली की, मुख्य पीक गव्हाची पेरणीही काही दिवसांत सुरू होईल. बहुतांश शेतकरी पारंपरिक गहू पिकाची पेरणी करतात. मात्र, दरम्यानच्या काळात शेतकरी विविध प्रकारच्या पिकांची लागवड करण्यात रस दाखवत आहेत. या भागात अनेक शेतकरी काळ्या गव्हाच्या लागवडीतून चांगला नफा कमावत आहेत.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
farmars Cultivation black wheat

farmars Cultivation black wheat

सध्या रब्बीची पेरणी जवळ आली आहे. यामध्ये चांगली थंडी पडली की, मुख्य पीक गव्हाची पेरणीही काही दिवसांत सुरू होईल. बहुतांश शेतकरी पारंपरिक गहू पिकाची पेरणी करतात. मात्र, दरम्यानच्या काळात शेतकरी विविध प्रकारच्या पिकांची लागवड करण्यात रस दाखवत आहेत. या भागात अनेक शेतकरी काळ्या गव्हाच्या लागवडीतून चांगला नफा कमावत आहेत.

यामुळे शेतकऱ्यांकडे हा एक चांगला पर्याय उपलब्ध आहे. काळ्या गव्हाच्या लागवडीसाठी नोव्हेंबर महिना सर्वात योग्य मानला जातो. लागवड सुरू करण्यापूर्वी, हे लक्षात ठेवले पाहिजे की हवामानात ओलावा असणे आवश्यक आहे. त्याची लागवड करून तुम्ही सामान्य गव्हाच्या तुलनेत अनेक पटीने अधिक नफा कमवू शकता.

दरम्यान, बाजारात त्याची किंमतही सामान्य गव्हापेक्षा जास्त आहे. बाजारात काळ्या गव्हाचा दर 4,000 ते 6,000 रुपये प्रति क्विंटल आहे. एक क्विंटल काळ्या गव्हाची किंमत सामान्य गव्हाच्या दुप्पट आहे. त्यानुसार शेतकरी सामान्य गव्हाच्या तुलनेत काळ्या गव्हातून मोठा नफा कमवू शकतो. काळ्या गव्हाच्या झाडांचे दाणे जेव्हा पिकल्यानंतर कडक होतात.

शेतकऱ्यांना दिलासा!लम्पीमुमृत्युमुखी पडलेल्या 3973 पशूंची नुकसान भरपाई खात्यावर जमा

एक बिघा शेतात 10 ते 12 क्विंटल गव्हाचे उत्पादन मिळते. औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असल्याने बाजारात काळ्या गव्हाची मागणी जास्त आहे. हृदयविकाराचा झटका, कर्करोग, मधुमेह, मानसिक तणाव, गुडघेदुखी, अशक्तपणा यांसारख्या आजारांवर हा घटक अत्यंत फायदेशीर आहे. यामुळे या गव्हाला चांगली मागणी देखील असते.

उसाचे वजन आता मोफत करून मिळणार, काटामारीमुळे नेता उतरला मैदानात..

या गव्हाची लागवड करण्यापूर्वी, हवामानात ओलावा असणे आवश्यक आहे. त्याचीही लागवड सामान्य गव्हाप्रमाणेच केली जाते. सामान्य गव्हाप्रमाणे त्याचीही काळजी घ्यावी लागते आणि तणनियंत्रणही करावे लागते. बाकी साध्या गव्हासारखेच नियोजन यामधून करावे लागले.

महत्वाच्या बातम्या;
'ऊस लागवडीचा खर्च वाढला, साखर उद्योगाकडून शेतकऱ्यांचे शोषण'
मालदांडी ज्वारीला 5001 रुपयांचा दर
भारतीय अन्न आणि कृषी, जगाचे पॉवरहाऊस

English Summary: Cultivation black wheat turns out boon farmers, bumper profits Published on: 10 November 2022, 10:27 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters