1. बातम्या

खामगाव बाजार समितीमध्ये सोयाबीन ला विक्रमी भाव, हमीभावाच्या दुप्पटीपेक्षा जास्त भाव

KJ Maharashtra
KJ Maharashtra
soybean

soybean

खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाला दुप्पट  किंमतीने हमीभाव  भेटत असल्याचे चित्र  आपल्याला  पाहायला भेटत आहे. २७ जुलै म्हणजे मंगळवारी खामगाव मधील कृषी बाजार समिती मध्ये शेतकऱ्यांच्या सोयाबीन ला ९६७५ रुपये असा विक्रमी भाव मिळाला आहे तर आजच्या दिवशी सोयाबीन चा भाव पाहायला गेले तर ९५०० रुपये असा उच्चांकी भाव मिळालेला आहे.

मंगळवारी बाजार समितीमध्ये १ हजार १५ क्विंटल सोयाबीन पिकाची आवक झालेली होती त्यास ९६७५ रुपये भाव मिळाला तर आज बाजार समितीमध्ये १ हजार ७९ क्विंटल सोयाबीन व्ही आवक झालेली आहे त्यास ९५०० रुपये भाव मिळालेला आहे.एका  बाजूला पाहायला  गेले तर शेतीतील शेतमालाला चांगला हमीभाव मिळावा म्हणून शेतकरी वर्ग रस्त्यावर उतरला आहे तर दुसरीकडे म्हणजेच विदर्भातील  खामगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेकऱ्यांच्या सोयाबीन पिकाला विक्रमी भाव मिळालेला आहे जो की अत्ता पर्यंतचा सर्वात मोठा भाव  समजला गेला आहे. अशी माहिती खामगाव मधील कृषी बाजार समितीचे दिलीप देशमुख यांनी दिलेली आहे.सोयाबीनच्या  अचानक  वाढत्या  भावामुळे  खामगाव मधील कृषी उत्पन्न बाजारात सोयाबीन ला मोठी मागणी मिळाली आहे जे की तेथील जिल्ह्यातील शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

हेही वाचा:केंद्राने राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलेले 701 कोटी रुपये आत्ताच्या संकटाचे नाही तर मग? भुसेंनी दिलं उत्तर


बुलढाणा जिल्ह्यामध्ये शेतकरी नेहमी मोठ्या प्रमाणात सोयाबीन चे पीक आपल्या शेतात लावतात जे की त्यांना त्यामधून चांगल्या प्रकारे उत्पन्न सुद्धा मिळते. मागील वर्षी जिल्ह्यामध्ये ३ लाख ८४ हजार हेक्टर क्षेत्रफळावर सोयाबीन पिकाचे उत्पादन घेतले होते तर यावर्षी अत्ता पर्यंत ३ लाख ५५ हजार हेक्टर क्षेत्रफळावर पेरणी केली आहे.

सोयाबीनवर खोडमाशीचं आक्रमण :

बुलढाणा जिल्ह्यामध्ये पिकांची परिस्थिती चांगली असून तेथील शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण आहे परंतु तेथिल काही भागात सोयाबीन या पिकावर चक्रीभुंगा व खोडमाशी या रोगाने आक्रमण केलेलं आहे. कृषी अधिकारी वर्गाने याबाबत तेथील शेतकऱ्यांना चांगले मार्गदर्शन केलेले आहे तसेच अजूनही काही ठिकाणी मार्गदर्शन चालू आहे.

सोयाबीनच्या दराचा उच्चांक :

लातूर मधील कृषी उत्पन्न बाजार समीतीमध्ये आज सोयाबीन पिकाला चांगला विक्रमी भाव मिळालेला आहे त्यामुळे तेथील शेतकरी वर्ग सुद्धा आनंदी आहे. सोयाबीन पिकाला कमीत कमी ९ हजार ८८१ तर ९ हजार ६०० रुपये भाव मिळालेला आहे. असे सांगितले जात आहे की आत्तापर्यंत सर्वात जास्त भाव सोयाबीन ला भेटलेला आहे.

दर वाढीचा फायदा कोणाला:

सोयाबीन चा ज्या वेळी हंगाम असतो त्यावेळी नेहमी भाव गडगडतात, जरी अत्ता दर वाढले असले तरी बहुतांश शेतकरी वर्गाच्या घरात सोयाबीन नसल्याने याचा फायदा शेतकरी वर्गाला होत नसून याचा फायदा व्यापारी वर्गाला होत असल्याचे चित्र आपल्याला दिसून येत आहे.

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters