1. बातम्या

रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये कपात ; सर्व प्रकारचे कर्ज होतील स्वस्त

KJ Staff
KJ Staff


कोरोनामुळे देशात लॉकडाऊन करण्यात आला असून शेतीसह अनेक उद्योग धंद्यांसमोर संकट उभे राहिले आहे.  अशा संकटात भारतीय रिझर्व्ह बँकेने नागरिकांना दिलासा दिला आहे. लॉकडाऊनमुळे लोकांना अडचणी होऊ नये यासाठी आरबीआयने कर्जाच्या पेमेंटमध्ये दिलासा देण्याचा आणि कर्ज स्वस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील तीन महिन्यांपर्यंत बँकांनी कर्ज आणि त्यावरील व्याज तसेच हफ्त्यांची वसूली करु नये,  असे निर्देश आरबीआयने देशभरातील बँकांना दिले आहेत. रेपो रेटमध्येही 0.75% कपात केली आहे. यामुळे सर्वप्रकारचे कर्ज स्वस्त होतील.

या रेपो दरावरच बँकांना आरबीआयकडून कर्ज मिळते. जर बँकांना स्वस्त कर्ज मिळाले तर ते देखील ग्राहकांसाठीचे दर कमी करतील. यापूर्वी रेपो रेट 5.15% होता, आता तो 4.40% आहे.  व्याजदर कपातीने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असून गृह, वाहन इतर कर्जांचा दर कमी होणार असून मासिक हफ्त्याचा भार कमी होणार आहे.  दरम्यान बाजारत रोकड उपलब्धता वाढविण्यासाठी एसएलआर दर ३ टक्के करण्यात आला आहे.  दरम्यान ईएमआयमध्ये सूट दिल्याचा अर्थ असा नाही की आपल्याला कधी थकबाकी भरावी लागणार नाही. फक्त तीन महिने पुढे ढकलू शकता. मात्र नंतर पैसे द्यावे लागतील. लॉकडाऊनमुळे ज्यांच्याकडे खरोखरच पैशांची कमतरता आहे, त्यांना कर्ज फेडण्यासाठी थोडा वेळ मिळावा या उद्देशाने हे पाऊल उचलले गेले आहे. सरकारने गुरुवारी 1.70 लाख कोटी रुपयांच्या दिलासा पॅकेजची घोषणा केली होती.  यामध्ये गरीब, शेतकरी, कामगार, महिला, वृद्ध, विधवा आणि अपंगांना मदत जाहीर करण्यात आली.  कोरोना व्हायसरमुळे देशात 21 दिवसांचा लॉकडाउन सुरू आहे. याचा अर्थव्यवस्था व जीवनावर परिणाम होत आहे.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters