शनिवारी स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी आत्मदहन आंदोलनाचा प्रयत्न केला होता. यामुळे एकच खळबळ उडाली होती. कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन ते आक्रमक झाली आहे. त्यांनी आत्मदहन आंदोलनाचा प्रयत्न केला होता.
यावेळी पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात संघर्ष झाला होता. त्यानंतर तुपकरांसह 25 सहकाऱ्यांनाही 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, आत्मदहन आंदोलनाच्या दणक्याने आता 42 कोटी रुपयांची पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यामुळे आता रविकांत तुपकरांच्या आंदोलनाला यश आलं आहे. दरम्यान, रविकांत तुपकर यांनी बुलढाणा जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर जाऊन, पोलिसी वेशात अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. यानंतर परिस्थिती आणखी चिघळेल म्हणून पोलिसांनी तुपकरांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं.
मत्स्यशेतीने नशीब पालटले, वर्षाला कमवतोय २ कोटी..
सध्या शेतकरी अडचणीत आला आहे. सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांची राज्य आणि केंद्र सरकारने फसवणूक केली असल्याचा तुपकरांनी म्हटलं होतं. कापसाला, सोयाबीनला दरवाढ मिळत नाही. 70 ते 80 टक्के सोयाबीन आणि कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. तरीही सरकार चर्चा करायला तयार नसल्याचं तुपकरांनी सांगितले होतं.
जनावरांच्या कृत्रिम गर्भाधानाचे फायदे आणि तोटे
दरम्यान, रविकांत तुपकरांनी कापूस, सोयाबीन आणि पीकविम्याच्या प्रश्नांवरुन आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यानंतर पोलिसांकडून तुपकर यांचा शोध सुरू होता. आंदोलनाचा इशारा देऊन तुपकर भूमिगत झाले होते. तुपकर पोलिसी वेशात येताच, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठा गदारोळ झाला होता.
महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनो उन्हाळी भेंडी लागवड तंत्रज्ञान जाणून घ्या..
शेतकऱ्यांनो कोथिंबीर लागवड तंत्रज्ञान, जाणून घ्या...
आदिवासी महिला गायीच्या शेणापासून स्वयंपूर्ण, तयार केला रंग, मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक..
Share your comments