केंद्र सरकारने (central government) 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये रेशन कार्ड जारी करण्यासाठी सामायिक नोंदणी सुविधा (Registration facility) सुरू केली आहे. या नोंदणीमुळे बेघर, निराधार, स्थलांतरित आणि इतर पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिकेसाठी अर्ज करणे सोपे होणार आहे.
'कॉमन रजिस्ट्रेशन फॅसिलिटी' (माझे रेशन-माझा हक्क) सुविधा आणली आहे. या संदर्भात अन्न सचिव सुधांशू पांडे म्हणाले, 'कॉमन रजिस्ट्रेशन फॅसिलिटी' (Common Registration Facility) चा उद्देश राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पात्र लाभार्थी ओळखणे हा आहे. जे लोकांना शिधापत्रिका देण्यास मदत करेल.
गेल्या 7 ते 8 वर्षात अंदाजे 18 ते 19 कोटी लाभार्थ्यांची सुमारे 4.7 कोटी शिधापत्रिका विविध कारणांमुळे रद्द करण्यात आली आहेत. पात्र लाभार्थ्यांना राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांद्वारे नियमितपणे नवीन कार्ड देखील जारी केले जातात.
शेतकऱ्यांना 'ही' शेती ठरतेय अत्यंत फायदेशीर; कमी गुंतवणुकीत घेतायत लाखोंची कमाई
सुरुवातीला नवीन वेब-आधारित सुविधा 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर उपलब्ध असेल. सर्व 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश या महिन्याच्या अखेरीस सुरू होतील.
या 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आसाम, गोवा, लक्षद्वीप, महाराष्ट्र, मेघालय, मणिपूर, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा, पंजाब आणि उत्तराखंड यांचा समावेश आहे, असेही अन्न सचिव यांनी माहिती दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
आधार धारकांसाठी UIDAI ने दिली महत्वाची माहिती; काही मिनिटांत होणार मोठा फायदा, जाणून घ्या...
Electric Tractor: शेतकरी मित्रांनो देशात लाँच होणार इलेक्ट्रिक ट्रॅक्टर; 'या' कंपनीने केली घोषणा
Daily Horoscope: 'या' राशीच्या लोकांचे पुढचे काही दिवस संकटाचे; जाणून घ्या राशिभविष्य
Share your comments