सध्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. आता रासायनिक खतांच्या किमती वाढल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च २२ टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळे कारखान्यांकडे असलेल्या अतिरिक्त निधींमधून शेतकऱ्याला अंतिम बिलापोटी चारशे रुपये मिळावेत, अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.
यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने १३ सप्टेंबर रोजी कोल्हापुरातील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार न केल्यास आगामी गळीत हंगामात साखर कारखाने सुरू करू दिले जाणार नाहीत, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.
पत्रकार परिषदेत बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, गेल्या दोन वर्षापासून आम्ही राज्य सरकारकडे सातत्याने ऊस दर नियंत्रण समिती स्थापन करण्याची मागणी करत होतो. सरकारने महिनाभरापूर्वी गडबडीने ऊस दर नियंत्रण समिती स्थापन केली आहे.
२०२२-२३ हंगामात राज्यातील अंदाजे ७० साखर कारखाने शेतकऱ्यांना प्रति टन ४०० रुपये जादा देवू शकतात. मात्र अद्याप २०२१-२२ गाळप हंगामाचा हिशोब झालेला नाही. मग २०२२-२३ हंगामातील पैसे कधी मिळणार? असा सवालही शेट्टी यांनी उपस्थित केला.
दरम्यान, जागतिक बाजारात साखरेचा दर वाढले आहेत. याचा विचार करून एफआरपी निश्चित झाली होती. मात्र साखर कारखान्यांना साखर, इथेनॉल आणि अन्य उपउत्पादनातून प्रति टन ५०० रुपये जादा मिळाले आहेत. यातून रेवेन्यु शेअरिंग फोर्मुला अंतर्गत शेतकऱ्यांना अंतिम बिलापोटी प्रति टन किमान ४०० रुपये द्यावेत, असेही ते म्हणाले.
मोठी बातमी! कोल्हापूरमध्ये गुरांचा बाजार, शर्यती, प्रदर्शन भरवण्यावर बंदी, जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश
एक शेतकरी एक डीपी योजना आहे फायदेशीर! जाणून घ्या अर्ज कसा करायचा...
झेंडूच्या फुलाची लागवड करून लाखो रुपये कमवा, जाणून घ्या संबंधित सर्व गोष्टी..
Share your comments