देशात भाजप विरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. एनडीए विरुद्ध इंडिया असे समीकरण सध्या पहायला मिळत आहे. विरोधी नेत्यांच्या बैठकाही होताना दिसत आहेत, आता अशाच प्रकारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने देखील काहीसे केले आहे.
राज्यातील मोठे राजकीय पक्ष छोट्या पक्षांना जुमानत नसल्याने अनेक छोट्या संघटनांसह पक्ष एकत्र येत राज्यात छोट्या पक्षांची नवी आघाडी तयार करण्यात आली असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली. यामुळे येणाऱ्या काळात काय घडामोडी घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, याला प्रागतिक विचार मंच असे नाव देण्यात आले आहे. याबाबत लवकरच बैठक कोल्हापुरात होणार असल्याची माहिती शेट्टी यांनी दिली. आम्ही एनडीए आणि मविआ मध्ये नसलेले छोटे पक्ष एकत्र येऊन हे नविन समिकरण मांडण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली.
तसेच याचबरोबर भाजप व एनडीए कडून सुरू असलेल राजकारण हे अत्यंत वाईट असून भाजपने फोडा आणि जोडा पद्धतीचे आणि धार्मिक तेढ निर्माण करत जे राजकारण सुरू केले आहे. याला आमचा विरोध असल्याने आम्ही नवीन समिकरणे मांडणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितलं.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीची बैठक संपन्न, नियुक्त्या जाहीर...
दरम्यान, सरकार स्थापन झाल्यानंतर सरकार मधले जे प्रस्थापित पक्ष होते त्यानी छोटा पक्षांना डावललं यामुळे आम्हाला महाविकास आघाडीचा अनुभव अतिशय वाईट आला, असेही ते म्हणाले.
पीककर्जासाठी सीबिल स्कोरची अट रद्द करावी! सरकारचा नियम फक्त कागदावर बँका ऐकत नाहीत...
माळवी गाय तुम्हाला श्रीमंत करेल, सर्वात जास्त दूध देणाऱ्या जातींपैकी एक
Share your comments