1. बातम्या

पिकविमा देण्यास टंगळमंगळ म्हणुन स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक; 'या' ठिकाणी केली तोडफोड

या खरीप हंगामात अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता मात्र पीक विमा काढला असतानादेखील अनेक पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना पीक विमा देण्यास टंगळमंगळ करताना दिसत होते. हिंगोलीत देखील अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पीक विमा काढला होता यासाठी शेतकऱ्यांनी पीक विम्याचे पैसे देखील कंपन्यांना दिले आहेत मात्र करोडो रुपये घशात उतरवून देखील पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना पीक विमा देण्यास दिरंगाई करत आहेत हिंगोलीत देखील अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पीक विमा काढला होता मात्र या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील पिक विमा कंपन्या पिक विमा देण्यास राजी नव्हते परिणामी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक धोरण अवलंबत एका पिक विमा कंपन्याच्या कार्यालयात तोडफोड केल्याचे वृत्त समोर आले आहे.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
crop insurance

पिक विमा कंपन्या शेतकऱ्यांकडून पीक विम्याचे पैसे खात असून देखील  पिकाचे नुकसान झाल्यास पीक विमा कंपनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास टंगळमंगळ करत असल्याचे दृश्य हिंगोलीत बघायला मिळाले होते. शेतकऱ्यांना पिक विमा देण्याऐवजी पिक विमा कंपनी पीक विम्यासाठी सरकारकडे बोट दाखवून पिक विमा देण्यास गेल्या अनेक दिवसांपासून टाळाटाळ करत होती. म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या विरोधात आंदोलन केल्याचे सांगितले जात आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने याआधी देखील पिक विमा संदर्भात आंदोलन केले होते यादी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हिंगोली च्या कृषी विभागात या पद्धतीने अनोखे आंदोलन केले होते. हिंगोली स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पिक विमा कंपन्या शेतकऱ्यांना पीक विमा देण्यास टंगळमंगळ करत असल्याचा आरोप करीत आहेत

या अनुषंगाने 2 फेब्रुवारी रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन देखील केले या दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हिंगोली शहरातील पीक विमा कंपनीचे एका मुख्य कार्यालयात तोडफोड केल्याचा आरोप संघटनेवर केला जात आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे हिंगोली पोलिसांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक केल्याची माहिती समोर येत आहे.

मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की राज्यात अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा कंपन्या विरुद्ध तक्रारी दाखल केल्या आहेत शेतकऱ्यांच्या मध्ये पीक विमा कंपनी नुकसान झाले असताना देखील पीक विम्याचा पैसा शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यास दिरंगाई करत आहेत तसेच याबाबत कंपनीकडे तक्रार केली असता कंपनी सरळ सरकारकडे बोट दाखवून मोकळी होत आहे. 

English Summary: crop insurance company avoiding farmers to give crop insurance Published on: 03 February 2022, 02:48 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters