अतिवृष्टीच्या संकटातून शेतकऱ्यांच्या हाताला आलेल्या सोयाबीनला प्रती क्विंटल ९ हजार तर कापासाला प्रती क्विंटल १३ हजार रुपये भाव मिळवून घेण्यासाठी मा.खा.राजु शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली विदर्भात राज्यव्यापी आंदोलन उभारणार असल्याचे माहिती विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी दिलेल्या प्रसिद्ध पत्रकातून दिली आहे. उस परीषद मेळाव्यासाठी राजु शेट्टी जालना
जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतांना वडीगोद्री विश्राम भवन येथे प्रशांत डिक्कर Prashant Dikkar at Vadigodri Vishram Bhawan while on a tour of the district यांच्या सह विदर्भातील संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी
शेट्टी यांची भेट घेतली. अतिवृष्टीच्या संकटातून शेतकऱ्यांच्या हाताला आलेल्या कापुस सोयाबीन भावाचा प्रश्न विदर्भ मराठवाड्यात ऐरणीवर आला आहे. त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा हे अपेक्षित आहे. त्यावेळी राजु शेट्टी यांनी बोलतांना
सांगितले उस आंदोलनाच्या धर्तीवर याच महिन्याच्या पुढच्या पंधरवाड्यात बुलढाणा जिल्ह्यातुन कापूस सोयाबीनच्या भावासाठी राज्यव्यापी आंदोलन उभे करुन कापसाला प्रती किंव्टल १३ हजार रुपये तर सोयाबीनला प्रती किंव्टल ९ हजार रुपये भाव देण्यासाठी सरकारला भाग पाडून विदर्भातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही असे राजु शेट्टी यांनी यावेळी बोलतांना सांगितले. तसेच शेतकऱ्यांनी कापूस सोयाबीनचा
योग्य भाव पदरात पाडून घेतल्या शिवाय हाताला आलेला कापुस सोयाबीन विकण्याची घाई करू नये असे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले. यावेळी युवा आघाडी विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर, युवती आघाडी प्रदेशाध्यक्षा पुजाताई मोरे,मराठवाडा अध्यक्ष गजानन पाटील बंगाळे, अकोला जिल्हाध्यक्ष गणेश खुमकर, बुलढाणा जिल्हाध्यक्ष अंनता मानकर, अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष सय्यद बाहोद्दीन,रोशन देशमुख,धनंजय कोरडे यांच्या सह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
Share your comments